सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण
सोलापूर, 01 मे (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67 व्या राज्य स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते शुक्रवार, दिनांक 1 मे 2026 रोजी सकाळी 7.10 वाजता ध्वजारोहण करण्यात आले.
gfdfg


सोलापूर, 01 मे (हिं.स.)।

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67 व्या राज्य स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते शुक्रवार, दिनांक 1 मे 2026 रोजी सकाळी 7.10 वाजता ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी महसूल लक्ष्मण कसेकर, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, अन्न धान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या सह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी राष्ट्रगीत वंदे मातरम चे गायन झाले. त्यानंतर राष्ट्र ध्वजवंदन व सलामी होऊन राष्ट्रगीत व राज्यगीतचे गायन झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी ज्येष्ठ नागरिक, मान्यवर व अधिकारी कर्मचारी यांची भट घेऊन त्यांना महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande