
ठाणे, 01 मे (हिं.स.)। ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या ८० कंत्राटी कामगारांच्या सुमारे २० वर्षाच्या लढ्याला यश मिळाले असून कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला मा. मुंबई न्यायालयाचे मा. न्यायमूर्ती श्री.जी. एस. कुलकर्णी व आरती साठे यांच्या खंडपिठाने समान काम समान वेतन तत्वानुसार मागील थकबाकी देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या आदेशामुळे कंत्राटी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सन. २००५ पासून मा. कामगार उपायुक्त, मा. महाराष्ट्र राज्य कंत्राटी कामगार सल्लागार मंडळ, मा. मुंबई उच्च न्यायालय, या. सर्वोच्च न्यायालय तसेच या. राज्य शासनाच्या पातळीवर म्युनिसिपल लेबर युनियन कामगार नेते रवी राव यांच्या मार्गदर्शनाखाली लढा देत होती.
सदर प्रकरणी मा. मुंबई उच्च न्यायालयाने वेळो वेळी दिलेले आदेश ठाणे महापालिका प्रशासन व राज्य शासन दाद देत नसल्याने सन. २०१३मध्ये रिटपिटीशन क्र. ५९८८/२०१३ मा. मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. मा. न्यायालयाच्या आदेशानुसार समान कामाला समान वेतनाचा प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या महासभेत दिनांक १९/१२/२०१३ ठराव क्र. ३१८ करण्यात आला. परंतू त्याची अंमलबजावणी होत नसल्याने संघटनेने पुन्हा मा. मुंबई उच्च न्यायालयात संबंधीत केसमध्ये सिव्हिल अॅप्लिकेशन १८७१/२०१८ दाखल केले. दिनांक २८ नोव्हेंबर २०१८ रोजी झालेल्या सुनावणीत मा. उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिले की, समान कामाला समान वेतन देण्याबाबत दिनांक १९/१२/२०१३ रोजीच्या ठरावाची अंमलबजावणी करावी. तसेच न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याबाबत नगरविकास विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव-२ श्रीकांत सिंग यांच्याविरूध्द सुपोटो कंटेम्प्ट पिटीशन क्र. ५२७/२०१८ दाखल करण्याचेही आदेशीत केले. दिनांक १४/१२/२०१८ रोजी झालेल्या सुनावणीत सदर विषयी झालेल्या दिरंगाईबाबत कंटेम्ट पिटीशन का दाखल करू नये ह्याबाबत आयुक्त, ठाणे महानगरपालिका यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मा. न्यायालयाने दिले. ह्याविरूध्द राज्य शासन व ठाणे मनपा प्रशासनाने पा. सर्वोच्च न्यायालयात एसएलपी क्र. ३२१/२०१८ व ३२२/२०१८ दाखल केल्या होत्या. दिनांक २५/२/२०२५ रोजी मा. सर्वोच्च न्यायालयाने या याचिका फेटाळल्या.
तदनंतर सदर केसवर मा. उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी घेण्यात आली. दिनांक २७ व २८ एप्रिल २०२६ रोजी मा. न्यायमूर्ती श्री.जी.एस. कुलकर्णी व श्रीमती आरती साठे यांच्या खंडपिठासमोर झालेल्या सुनावणीत मा. न्यायालयाने ठाणे मनपा प्रशासन व राज्य शासनाकडून झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत समान कामाला समान वेतनाच्या थकबाकीची रक्कम ४ आठवड्धान अदा करण्याबाबतचे प्रतिज्ञा पत्र सादर करण्याचे आदेश दिले. तसेच पुढील सुनावणी होईपर्यंत महापालिका प्रशासनाला इतर कोणत्याही प्रकारचे पेमेंट करण्यास मनाई केली.
दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी झालेल्या सुनावणीत ठाणे महापालिका आयुक्त श्री सौरभ राव यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मा. उच्च न्यायालयाने तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाबद्दल आदर व्यक्त करत त्यांचे पालन करण्यात झालेल्या दिरंगाईबाबत दिलगीरी व्यक्त केली, तसेच आजपासून ४ आठवडद्यात कंत्राटी कामगारांची थकबाकी अदा करण्याची हमी ह्या प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे. सदर प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेत मा. न्यायमूर्तींनी वेळेत थकबाकी अदा करण्याबाञ्चत योग्य पावले उचलण्याचे आदेश देतानाच पुढील योग्य आदेशासाठी दिनांक ८ जून २०१६ रोजी सुनावणी ठेवली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर