आ. नारायण कुचे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 13 मे (हिं.स.)। महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयोजित तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व सन २०२६-२७ आढावा बैठक तहसील कार्यालय, अंबड येथे आमदार नारायण कुचे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. यावेळी तहसीलदार विजय चव्हाण , कृषी उप
अ


छत्रपती संभाजीनगर, 13 मे (हिं.स.)।

महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयोजित तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व सन २०२६-२७ आढावा बैठक तहसील कार्यालय, अंबड येथे आमदार नारायण कुचे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.

यावेळी तहसीलदार विजय चव्हाण , कृषी उपअधीक्षक रोडगे , गटविकास अधिकारी कवडदेवी मॅडम, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब गंडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अवधूत नाना खडके, सर्व प्रमुख पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी बांधव व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीमध्ये आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे व खत उपलब्धता, पीक नियोजन, शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच विविध कृषी योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शासनाच्या योजना प्रभावीपणे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवून शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने कार्य करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचा योग लाभला, याचा विशेष आनंद वाटला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande