सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल
चंदीगड, 13 मे (हिं.स.)। काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना सकाळी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना नियमित आरोग्य तपासणी आणि एका छोट्या शस्त्रक्रियेसाठी मेदांता रुग्णालयात आणण्यात आ
Sonia Gandhi Admitted Medanta Hospital Gurugram


चंदीगड, 13 मे (हिं.स.)। काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना सकाळी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना नियमित आरोग्य तपासणी आणि एका छोट्या शस्त्रक्रियेसाठी मेदांता रुग्णालयात आणण्यात आले आहे. त्या वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखेखाली आहेत.

७९ वर्षीय सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबत मेदांता रुग्णालयाने अद्याप अधिकृत माहिती जारी केलेली नाही. यापूर्वी, मार्च महिन्यात सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांच्यावर सिस्टेमिक इन्फेक्शनवर उपचार करण्यात आले होते. काँग्रेस नेते आणि समर्थकांनी त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande