डोंबिवलीत सामाजिक बांधिलकी जोपासत प्रभागात होत आहेत विशेष पावसाळी कामे !
डोंबिवली, 13 मे (हिं.स.)। पावसाळ्यातील परिस्थिती त्रासदायक ठरू नये यासाठी पालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेऊन पावसाळ्यात कोणत्या उपाययोजनाना प्राधान्य द्यावे याचा आराखडा तयार केला. मात्र नुकत्याच पालिका निवडणुका होऊन नवनिर्वाचि
Ph2


Ph1


डोंबिवली, 13 मे (हिं.स.)।

पावसाळ्यातील परिस्थिती त्रासदायक ठरू नये यासाठी पालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेऊन पावसाळ्यात कोणत्या उपाययोजनाना प्राधान्य द्यावे याचा आराखडा तयार केला. मात्र नुकत्याच पालिका निवडणुका होऊन नवनिर्वाचित नगरसेवकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत यापूर्वीच पावसाळ्यात सामान्य नागरिकांना धोका पोहचू न्याये म्हणून आपापल्या प्रभागात विशेष स्वच्छता मोहीम व आरोग्य संवर्धन यासाठी स्वतः पदाधिकाऱ्यांच्या व जनतेच्या सहकार्याने कामांना सुरुवात केली आहे. डोंबिवली विभाग अंतर्गत प्रभाग क्रमांक २३ येथील नगरसेविका रसिका पाटील याबाबत आघाडीवर असून स्वच्छ सुंदर प्रभाग व आरोग्याची काळजी यासाठी जागरूक आहेत. याविषयी विविध कामांच्या माध्यमातून त्यांनी भर दिल्याने प्रभागातील लोकं समाधान व्यक्त करीत आहेत.

नगरसेविका रसिका पाटील आणि कृष्णा पाटील यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांसाठी अधिक स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने, प्रभागातील विविध भागांमध्ये स्वच्छता मोहिम यशस्वीरित्या राबवण्यात आल्या. नागरिकांच्या तक्रारी आणि नियमित तपासणीच्या अनुषंगाने, रस्ते, सार्वजनिक जागा, गटारांचे भाग आणि परिसरातील जागांची सखोल स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता राखणे आणि पावसाळ्याच्या काळात नागरिकांना होणारा त्रास टाळणे या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे त्या सांगतात.

झाडांच्या फांद्या छाटणी व स्वच्छता :

प्रभागातील नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन विविध ठिकाणी झाडांच्या धोकादायक व अडथळा निर्माण करणाऱ्या फांद्यांची छाटणी करण्यात आली. तसेच छाटणीनंतर रस्त्यावर पडलेल्या फांद्या व कचरा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सहकार्याने तात्काळ उचलून घेण्यात आला.

नागरिकांची सुरक्षितता, स्वच्छता आणि सोयीसाठी असे काम सातत्याने सुरू असतात.

मच्छर नियंत्रणासाठी धूर फवारणी मोहीम :

प्रभागात मच्छरांचे प्रमाण वाढल्याबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

त्या अनुषंगाने संबंधित परिसरात धूर फवारणी करून मच्छरांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अशी मोहीम राबविण्यात येते.

लसीकरण मोहिम :

नवजात शिशु ते 16 वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी लसीकरण मोहीम कल्याण डोंबिवली महानगरपालिका तथा ठाकूरवाडी आरोग्य केंद्र यांच्या माध्यमातून राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये बालकांना आवश्यक लसी देण्यात आल्या तसेच पालकांना आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

महिना आधारकार्ड विशेष शिबीर :

डोंबिवलीतील नागरिकांसाठी पु. भा. भावे शाळा क्र. 66 जुनीडोंबिवली गाव येथे विशेष 1 महिना आधारकार्ड शिबीर आयोजित करण्यात आले. प्रभाग क्र. 23 च्या नगरसेविका रसिका कृष्णा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून हे शिबीर सुरू करण्यात आले. या शिबिर माध्यमातून.नवीन आधार कार्ड नोंदणी, आधार कार्ड दुरुस्ती - अपडेट

(नाव, पत्ता, मोबाईल नंबर इ.), बायोमेट्रिक अपडेट, लहान मुलांचे आधार कार्ड नोंदणी आदी कामे झाली. विशेष म्हणजे जुनी डोंबिवलीतील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande