टीझरसोबत 'माँ बहन'च्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर
मुंबई, 15 मे (हिं.स.)। अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी यांचा बहुप्रतिक्षित ''माँ बहन'' चित्रपटाचा टीझर अखेर प्रदर्शित झाला आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित हा चित्रपट बऱ्याच क
टीझरसोबत 'माँ बहन'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर


मुंबई, 15 मे (हिं.स.)। अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी यांचा बहुप्रतिक्षित 'माँ बहन' चित्रपटाचा टीझर अखेर प्रदर्शित झाला आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित हा चित्रपट बऱ्याच काळापासून चर्चेत असून आता प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज आहे. यापूर्वी विद्या बालन हिच्या 'तुम्हारी सुलू'मधील भूमिकेसाठी सुरेश यांचे कौतुक झाले होते.

४६ सेकंदांच्या या टीझरमध्ये, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी एका मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. धर्ना दुर्गा देखील त्यांना मदत करताना दिसत आहे. तृप्ती आणि धर्ना या चित्रपटात माधुरीच्या मुलींची भूमिका साकारत आहेत. या टीझरमध्ये डार्क ह्युमर, रहस्य आणि हलक्याफुलक्या विनोदाचे अनोखे मिश्रण पाहायला मिळते. रवी किशन यांचीही या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका आहे. एका अनपेक्षित गुन्ह्याभोवती आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणींभोवती या चित्रपटाची कथा फिरते.

टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. माधुरी दीक्षितची अनोखी शैली आणि तृप्ती डिमरीच्या प्रभावी उपस्थितीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 'मा बहन' ४ जून २०२६ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. चाहते या चित्रपटाबद्दल आधीच प्रचंड उत्सुक आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande