'कमळी' आणि 'सनई चौघडे' मालिकांचा रंगणार महासंगम
मुंबई, 19 मे (हिं.स.)। जेव्हा प्रेक्षकांचे दोन लाडक्या मालिका एकत्र येतात, तेव्हा छोट्या पडद्यावर जो धमाका होतो, त्याची मजा काही वेगळीच असते! झी मराठीवरील अश्याच दोन लोकप्रिय मालिका ''कमळी'' आणि ''सनई चौघडे'' विशेष ''महासंगम'' भागासाठी एक
'कमळी' आणि 'सनई चौघडे' मालिकांचा रंगणार महासंगम


मुंबई, 19 मे (हिं.स.)। जेव्हा प्रेक्षकांचे दोन लाडक्या मालिका एकत्र येतात, तेव्हा छोट्या पडद्यावर जो धमाका होतो, त्याची मजा काही वेगळीच असते! झी मराठीवरील अश्याच दोन लोकप्रिय मालिका 'कमळी' आणि 'सनई चौघडे' विशेष 'महासंगम' भागासाठी एकत्र येत आहेत. जेव्हा दोन वेगवेगळ्या मालिकांचे कलाकार एकमेकांना भेटतात, तेव्हा कथेमध्ये फक्त संवाद नाही तर प्रचंड ड्रामा, अनपेक्षित ट्विस्ट आणि थरारक वळणं पाहायला मिळतात. हा महासंगम प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची एक मोठी मेजवानी ठरणार यात शंका नाही. सध्याच्या कथानकानुसार, एकीकडे 'कमळी' आपल्या उदरनिर्वाहासाठी नोकरीच्या शोधात भटकत आहे. तर दुसरीकडे, 'सनई चौघडे' मालिकेत जय आणि शर्वरी हे असावरी आणि गौतम यांच्या लग्नासाठी प्रचंड चिंतेत आहेत. अशाच एका कठीण प्रसंगात जय, शर्वरी, ऋषी आणि कमळी यांची भेट होणार आहे. कमळी कामाच्या शोधात थेट पमाकडे पोहोचणार आहे.

जय, शर्वरी, ऋषी आणि कमळी हे चौघे मिळून एक मोठा निर्णय घेणार आहेत. असावरी आणि गौतम यांच नाव एका 'सामूहिक विवाह सोहळ्या' साठी नोंदवणार आहे. विशेष म्हणजे, हा सामूहिक विवाह सोहळा राजन यांनी 'अन्नपूर्णा' यांच्या नावाने आयोजित केला आहे. सर्व काही सुरळीत चालू असतानाच, या सोहळ्यात विघ्न आणण्यासाठी दोन मोठ्या खलनायिका अनिका आणि समायरा एकत्र येणार आहेत. या दोन्ही खलनायिका या महासंगमात एकत्र येऊन काहीतरी नवीन कट रचणार आहेत. जो कमळी आणि शर्वरी या दोघींना मोठं नुकसान पोचवणार आहे. आता या खलनायिकांच्या दुष्ट कारस्थानामुळे या सामूहिक विवाह सोहळ्यात असावरी आणि गौतम यांचे लग्न यशस्वीपणे पार पडेल का? की या सगळ्या गोंधळात जय, शर्वरी, ऋषी आणि कमळी सुद्धा अडकले जातील? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या महासंगमात मिळणार आहेत.

‘कमळी’ म्हणजेच विजया बाबर ने 'सनई चौघडे' सोबत महासंगम शूटचा अनुभव सांगताना सांगितले, 'आमचा हा तिसरा महासंगम आहे पहिला तारिणी , दुसरा लक्ष्मी निवास आणि आता 'सनई चौघडे' टीम सोबत. खूप मजा येत आहे. राजूसरांसोबत आम्हा सर्वानाच काम करायचे होते आणि आम्ही खूप उत्साहात होतो. महासंगम शूट करण कठीण असतं कारण इतके लोक असतात आणि पूर्ण 1 तासाचा भाग शूट करायचा असतो आणि त्यात उन्हाळा, टीम कमळीला सवय झाली आहे आणि आम्ही जोमाने तयार असतो. या महासंगम भागात ऋषी कमळी यांच्या नात्याला काहीतरी नवीन दिशा मिळणार आहे.

नात्यांची नवी समीकरणे पाहण्यासाठी सज्ज व्हा! १८ ते २२ मे 'कमळी' आणि 'सनई चौघडे' मालिकांचा धमाकेदार 'महासंगम' रात्री ८.३० ते ९.३० वा. सदैव तुमच्या मराठीवर.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande