अमरावती पोलीसांची मोठी कारवाई; २ कोटींपेक्षा अधिक किंमतीचा अंमली पदार्थ नष्ट
अमरावती, 02 मे, (हिं.स.) - अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल २,०३,७५,००० रुपयांचा गांजा, चरस आणि एमडी (मेफेड्रोन) असा मुद्देमाल जाळून नष्ट केला. ही कारवाई २ मे २०२६ रोजी महाराष्ट्र एनवायरो पॉवर लिमिटेड येथे
अमरावती पोलीसांची मोठी कारवाई; २ कोटींपेक्षा अधिक किमतीचा अंमली पदार्थ जाळून नष्ट


अमरावती, 02 मे, (हिं.स.) - अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल २,०३,७५,००० रुपयांचा गांजा, चरस आणि एमडी (मेफेड्रोन) असा मुद्देमाल जाळून नष्ट केला. ही कारवाई २ मे २०२६ रोजी महाराष्ट्र एनवायरो पॉवर लिमिटेड येथे करण्यात आली.

एनडीपीएस अॅक्ट १९८५ अंतर्गत दाखल ५८ गुन्ह्यांमधील हा मुद्देमाल होता. यात ३६८.४३ किलो गांजा, १.५५१ किलो चरस आणि १.२५३ किलो एमडीचा समावेश होता. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या सर्व प्रकरणांतील जप्त अंमली पदार्थ नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.या ५८ प्रकरणांमध्ये नागपुरी गेट (१६), बडनेरा (१३), गाडगेनगर (११), खोलापुरी गेट (३), नांदगाव पेठ (६), फ्रेजरपुरा (४), वलगाव (२), सिटी कोतवाली (२) आणि राजापेठ (१) या पोलीस ठाण्यांचा समावेश होता. सन १९९६ पासून नोंद असलेल्या या प्रकरणांचा न्यायालयीन निकाल लागल्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली.

या मोहिमेसाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय ड्रग डिस्पोजल समिती स्थापन करण्यात आली होती. यामध्ये पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि पोलीस उपायुक्त (मुख्यालय) रमेश धुमाळ यांचा समावेश होता. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर हा मुद्देमाल नागपूर येथील बुटीबोरी एमआयडीसीमध्ये नेऊन इन्सिनरेटरच्या साहाय्याने नष्ट करण्यात आला.ही कारवाई ड्रग डिस्पोजल समिती, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, कंपनीचे प्रतिनिधी, पंच आणि पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली. या मोहिमेमुळे अंमली पदार्थांविरोधातील कारवाईला अधिक बळ मिळाले असून समाजात सकारात्मक संदेश गेला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande