NEET परीक्षेत पालकांसाठी NSUI चा उपक्रम; बसण्याची व्यवस्था व पाणी वाटपाचे आयोजन
लातूर, 02 मे (हिं.स.)। महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी म्हणून ओळख असलेल्या लातूर शहरात ३ मे रोजी होणाऱ्या NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी काँग्रेस, लातूर (NSUI) तर्फे पालकांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. परीक्षा केंद
नीट परीक्षा


लातूर, 02 मे (हिं.स.)।

महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी म्हणून ओळख असलेल्या लातूर शहरात ३ मे रोजी होणाऱ्या NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी काँग्रेस, लातूर (NSUI) तर्फे पालकांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांच्या पालकांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार असून, उन्हाच्या तीव्रतेचा विचार करून सुमारे १० हजार पाण्याच्या बाटल्यांचे वितरणही केले जाणार आहे. या उपक्रमामुळे परीक्षा केंद्रांवर थांबणाऱ्या पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या उपक्रमाचा जास्तीत जास्त पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यार्थी काँग्रेस, लातूर (NSUI) चे जिल्हाध्यक्ष रोहित बिराजदार आणि जिल्हा-उपाध्यक्ष महेश सोळंके यांनी केले आहे.

यावेळी उबेद शेख, श्रवण काकडे, अबूजर शेख, कमलेश वारद, प्रथमेश राठोड आणि चैतन्य रोडे हे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande