रत्नागिरी : अखिल भारतीय नाट्य परिषदेचा युवा नाट्य पुरस्कार अमेय धोपटकर यांना जाहीर
रत्नागिरी, 24 मे (हिं.स.) । अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा ‘युवा नाट्य पुरस्कार’ रत्नागिरीचे नाट्यलेखक अमेय धोपटकर यांना जाहीर झाला आहे. प्रतिवर्षी ज्येष्ठ नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनानिमित्त १४ जूनला पुरस्कार वितरण आणि कलावंत
रत्नागिरी : अखिल भारतीय नाट्य परिषदेचा युवा नाट्य पुरस्कार अमेय धोपटकर यांना जाहीर


रत्नागिरी, 24 मे (हिं.स.) । अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा ‘युवा नाट्य पुरस्कार’ रत्नागिरीचे नाट्यलेखक अमेय धोपटकर यांना जाहीर झाला आहे.

प्रतिवर्षी ज्येष्ठ नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनानिमित्त १४ जूनला पुरस्कार वितरण आणि कलावंत मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.

नाट्य परिषदेतर्फे नाट्यलेखन, रंगभूषा, अभिनय, तंत्रज्ञ तसेच लक्षवेधी विनोदी भूमिका अशा विविध क्षेत्रांतील रंगकर्मींना पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. धोपटकर यांचे नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय योगदान आहे. त्यांनी ‘संगीत कुरुमणी’ आणि ‘संगीत मल्लिका’ या नाटकांचे लेखन केले असून, या नाटकांनी राज्यस्तरीय संगीत नाट्यस्पर्धांमध्ये विशेष यश मिळवले आहे. धोपटकर हे कवी, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आणि तंत्रज्ञ म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या ‘संगीत मल्लिका’ या नाटकाला राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला होता. त्यांच्या नाट्यलेखनाची दखल घेत बालगंधर्व-संगीत रसिक मंडळाने त्यांना ‘अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार’ देऊन गौरवले होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती शाखेतर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. १४) जूनला दुपारी ४ वा. यशवंत नाट्यमंदिर माटुंगा (मुंबई) येथे होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande