वर्षानुवर्षे प्रलंबित ड्रेनेज समस्येला अखेर मार्ग; उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांचा पुढाकार
सोलापूर, 26 मे (हिं.स.)। सोलापूर प्रभाग क्र. २३ मधील साईदीप नगर, अथर्व रेसिडेन्सी आणि शाईन नगर परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ड्रेनेज समस्येच्या निराकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखा
वर्षानुवर्षे प्रलंबित ड्रेनेज समस्येला अखेर मार्ग; उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांचा पुढाकार


सोलापूर, 26 मे (हिं.स.)। सोलापूर प्रभाग क्र. २३ मधील साईदीप नगर, अथर्व रेसिडेन्सी आणि शाईन नगर परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ड्रेनेज समस्येच्या निराकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते मनीष देशमुख यांच्या सूचनेनुसार उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.ड्रेनेज विभागाचे अधिकारी श्री. रामचंद्र पेंटर, विभागीय कार्यालय क्रमांक ६ चे अधिकारी श्री. पानगल, कनिष्ठ अभियंते व कर्मचारी यांच्या उपस्थितीत नागरिकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर रखडलेल्या ड्रेनेज कामाला अखेर मार्ग मोकळा झाला.तीव्र उन्हातही उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी परिसरात प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत उपमहापौरांचे आभार मानले.यावेळी नगरसेवक राजशेखर पाटील, सत्यजित वाघमोडे, भाजप दक्षिण पश्चिम मंडल अध्यक्ष महेश देवकर तसेच महानगरपालिका अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande