सांस्कृतिक समृद्धता वाढविण्यात वस्तुसंग्रहालयाचे मोठे योगदान - डॉ. तेजस गर्गे
छत्रपती संभाजीनगर, 26 मे (हिं.स.)। वस्तुसंग्रहालय हे आपला इतिहास आणि संस्कृती जतन कार्य करत असते. या कार्याच्या माध्यमातून संस्कृतीची नव्याने ओळख जगासमोर नेण्याचे काम वस्तुसंग्रहालय करत असतात. म्हणूनच सांस्कृतिक समृद्धता वाढविण्यात इतिहास वस्तुसंग्
अ


छत्रपती संभाजीनगर, 26 मे (हिं.स.)। वस्तुसंग्रहालय हे आपला इतिहास आणि संस्कृती जतन कार्य करत असते. या कार्याच्या माध्यमातून संस्कृतीची नव्याने ओळख जगासमोर नेण्याचे काम वस्तुसंग्रहालय करत असतात. म्हणूनच सांस्कृतिक समृद्धता वाढविण्यात इतिहास वस्तुसंग्रहालयाचे मोठे योगदान राहिले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी प्रतिपादन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सांस्कृतिक कार्य विभाग पुरातत्व वस्तुसंग्रहालय संचलनालय अंतर्गत सहाय्यक अभिरक्षक, प्रादेशिक वस्तूसंग्रहालय,छत्रपती संभाजीनगर व इतिहास व प्राचीन भारतीय संस्कृती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती विभागाच्या प्रमुख डॉ. गीतांजली बोराडे होत्या. जागतिक वस्तूसंग्रहालय दिनानिमित्त महाराष्ट्रातील वस्तुसंग्रहाचा विकास या विषयावर डॉ. तेजस गर्गे यांचे झाले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील वस्तूसग्रहालयाचा इतिहास आणि त उदय, समृद्ध परंपरा कशी आहे याची उदाहरणे देऊन स्पष्टीकरण दिले. सध्या महाराष्ट्रामध्ये राज्य पुरातत्व विभागाची १४ वस्तुसंग्रहालय असून, विद्यापीठ व इतर संस्थांची ४० वस्तूसंग्रहालय आहेत व १०७ खासगी वस्तूसंग्रहालय संपूर्ण महाराष्ट्रात असून यामध्ये चित्रकला, शिल्पकला व इतर महत्त्वाच्या वस्तू आहेत. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पैठण, सिंदखेडराजा, माहूर, सांगली, मुंबई येथे वस्तुसंग्रहालय आहेत. भविष्याचा वेध घेताना कार्पोरेट म्युझियमची वाढती व्याप्ती होत आहे. त्यामुळे नव्या पिढीला खाजगी वस्तुसंग्रहालयामध्ये नोकरीच्या भरपूर संधी आहे. त्याचबरोबर बिहार वस्तुसंग्रहालयाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय हे निर्मितीची योजना आसुन महाराष्ट्र शासनाने बीकेसी मध्ये साडेतीन एकर जागा दिली असून महाराष्ट्र राज्याचे मोठे वस्तुसंग्रहालय मुंबई येथे उभारण्यात येणार आहे असेही ते म्हणाले. विभागप्रमुख डॉ. गीतांजली बोराडे यांनी विद्यापीठातील वस्तू संग्रहालयाच्या निर्मितीची व भविष्यातील वेगवेगळ्या दालनांची माहिती दिली. पुढील कालखंडात विद्यापीठातील वस्तू संग्रहालय हे सुद्धा एक मोठे वस्तू संग्रहालय म्हणून उभे राहील, असेही त्या म्हणाल्या.डॉ. संजय पाईकराव यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande