देशभरात 4 मे ते 10 मे या कालावधीत 'अग्निसुरक्षा सप्ताह' पाळण्यात येणार
नवी दिल्ली, 03 मे (हिं.स.)। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि सबंधित केंद्रीय मंत्रालये, विभाग यांच्या सहकार्याने, देशभरातील आरोग्यसेवा सुविधांमध्ये, आगीचा प्रतिबंध आणि आगीचे धोके कमी करण्याचे महत्त्व वृ
Fire Safety Week  Observed Nationwide  May 4 to 10, 2026


नवी दिल्ली, 03 मे (हिं.स.)। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि सबंधित केंद्रीय मंत्रालये, विभाग यांच्या सहकार्याने, देशभरातील आरोग्यसेवा सुविधांमध्ये, आगीचा प्रतिबंध आणि आगीचे धोके कमी करण्याचे महत्त्व वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने 4 मे ते 10 मे 2026 या कालावधीत देशभरात 'अग्निसुरक्षा सप्ताह' पाळणार आहे.

या सप्ताहाचे औपचारिक उद्घाटन उद्या दिल्लीतील कर्तव्य भवन-1 येथे केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या उद्गाटन समारंभादरम्यान, संपूर्ण आठवडाभराच्या कालावधीत देशपातळीवर राबवण्यात येणाऱ्या जागृती आणि पूर्वतयारीविषयक विविध उपक्रमांच्या मालिकेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

उद्घाटन समारंभाचा एक भाग म्हणून, 'आरोग्य सुविधांमधील अग्नि सुरक्षा' या विषयावर आरोग्य सचिवांमार्फत शपथ दिली जाणार असून, त्याद्वारे सर्व भागधारकांची, अग्नी सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन, अधिक भक्कम पूर्वतयारी आणि आरोग्यसेवा संस्थांमध्ये सुरक्षा संस्कृती रूजवणे या सर्वांविषयीची कटिबद्धता अधोरेखित केली जाणार आहे.

आठवडाभराच्या कालावधीत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश विविध उपक्रम राबवणार आहेत. यामध्ये जनजागृती मोहिमा, प्रात्यक्षिक सराव, क्षमता बांधणी उपक्रम आणि अग्नि सुरक्षा कार्यपद्धतींचा प्रसार करणे यांचा समावेश असेल, ज्याचा उद्देश आरोग्य कर्मचारी आणि प्रशासकांना अग्नि प्रतिबंध, आपत्कालीन प्रतिसाद आणि सुरक्षित स्थळी हलवण्याच्या प्रक्रियेबाबत सचेत करणे हा आहे.

या सप्ताहातून, आरोग्य सेवा वितरण प्रणालीअंतर्गत असलेल्या सर्व स्तरांतील अग्निसुरक्षा यंत्रणांना बळकटी देण्यास चालना देणे तसेच सुरक्षितता आणि पूर्वतयारीची सवय जोपासत रुग्णांची, आरोग्यसेवा कर्मचारी आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधा यांचे रक्षण करण्याविषयी मंत्रालयाच्या अथक कटिबद्धतेतून भर दिला जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande