जपानच्या महावाणिज्यदूत सातो हितोमी यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट
मुंबई, 04 मे (हिं.स.) - मुंबईतील जपानच्या महावाणिज्यदूत सातो हितोमी यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली. श्रीमती हितोमी यांनी नव्यानेच पदभार स्वीकारल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी त्यांचे अभिनंदन
जपान महावाणिज्यदूत सातो हितोमी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भेट


मुंबई, 04 मे (हिं.स.) - मुंबईतील जपानच्या महावाणिज्यदूत सातो हितोमी यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली. श्रीमती हितोमी यांनी नव्यानेच पदभार स्वीकारल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.

महाराष्ट्र-जपान संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने आर्थिक भागीदारी, राज्यातील विशेषतः उत्पादन व मोटार वाहन क्षेत्रात जपानी गुंतवणूक, पर्यटन, क्रीडा व युवक कल्याण क्षेत्रातील सहकार्य, शेती विषयक तसेच अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून सांस्कृतिक आदान-प्रदान, शैक्षणिक देवाण-घेवाण अशा विविध विषयांवर यावेळी उभयंतामध्ये चर्चा झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande