


मुंबई, 04 मे (हिं.स.)। निसान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने ऑल-न्यू निसान ग्रॅव्हाइटसाठी सरकारमान्य सीएनजी रेट्रोफिटमेंट किट सादर करत भारतीय वाहन बाजारात महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. या किटमध्ये श्रेणीतील पहिल्यांदाच स्मार्ट ट्विन-सिलेंडर तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला असून त्यामुळे गाडीची पूर्ण ७-सीटर रचना आणि वापराची सोय कायम ठेवणे शक्य झाले आहे. ८२,९९९ रुपयांच्या प्रारंभिक किमतीत उपलब्ध असलेले हे किट सध्या १६ राज्यांमधील ६० शहरांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले असून अधिक किफायतशीर, पर्यावरणपूरक आणि स्मार्ट प्रवासाचा पर्याय ग्राहकांसाठी खुला करण्यात आला आहे.
ऑल-न्यू निसान ग्रॅव्हाइट सीएनजी ही संकल्पना “स्मार्ट पॉवर विथ स्मार्टर सेव्हिंग्ज” या विचारावर आधारित आहे. पेट्रोलच्या तुलनेत प्रति किलोमीटर खर्च कमी करताना गाडीची आरामदायी रचना, आतील जागा आणि दैनंदिन वापरातील कार्यक्षमता यामध्ये कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे ट्विन-सिलेंडर (२ x २५ लिटर) सेटअपमुळे बूट स्पेस आणि तिसऱ्या रांगेतील बसण्याची सोय कायम ठेवण्यात यश आले आहे, जे ७-सीटर वाहनांमध्ये मोठे वैशिष्ट्य मानले जाते.
हे सीएनजी किट मोटोझेनकडून विकसित आणि उत्पादित करण्यात आले असून त्याच्या गुणवत्तेची पूर्ण हमी देण्यात आली आहे. ग्राहकांना हे किट निसानच्या अधिकृत विक्रेत्यांमार्फत बसवता येणार आहे, ज्यामुळे ही प्रक्रिया अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि सुलभ बनते. याशिवाय किटच्या घटकांवर ३ वर्षे किंवा १,००,००० किलोमीटरपर्यंत तृतीय-पक्ष हमी देण्यात येत आहे, ज्यामुळे ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होतो.
निसान आणि इन्फिनिटीचे मध्य पूर्व, केएसए, सीआयएस आणि भारत विभागीय उपाध्यक्ष आणि अध्यक्ष थिएरी सब्बाग यांनी या लाँचबाबत सांगितले की भारत ही निसानसाठी अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ असून ग्राहकांच्या बदलत्या गरजांनुसार अधिक सुलभ, परवडणारे आणि भविष्याभिमुख मोबिलिटी उपाय देण्यावर कंपनीचा भर आहे. ऑल-न्यू निसान ग्रॅव्हाइटसाठी सीएनजी पर्याय सादर करणे हे त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असून यामुळे कुटुंबांसाठी अधिक जागा, कमी देखभाल खर्च आणि विश्वासार्ह प्रवास यांचा समतोल साधला जातो.
निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्सा यांनी सांगितले की निसान मॅग्नाइट सीएनजीला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर आता ग्रॅव्हाइटसाठी ट्विन-सिलेंडर सीएनजी उपाय सादर करण्यात आला आहे. ७-सीटर एमपीव्हीच्या वापरातील लवचिकता, आराम आणि व्यावहारिकता लक्षात घेऊन हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. यामध्ये जागा किंवा सोयींशी कोणतीही तडजोड न करता इंधन बचतीसह अधिक कार्यक्षम प्रवासाचा अनुभव देण्यावर भर देण्यात आला आहे.
या सीएनजी प्रणालीमध्ये सिक्वेन्शियल बीएस६.२ अनुरूप किट, आयकॅट मान्यताप्राप्त सुरक्षितता प्रणाली, ८.१ मिमी जाडीचे मजबूत सिलेंडर आणि ग्रॅव्हाइटसाठी खास विकसित केलेले डायनॅमिक अॅडव्हान्सर तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. याशिवाय बंदिस्त इंधन भरण्याची सोय, सुबक आणि सुरक्षित बसवणीसाठी मजबूत ब्रॅकेट्स, आरामदायी मागील सीट रचना आणि पेट्रोल व सीएनजीमध्ये त्वरित बदल करता येणारी स्विच प्रणाली यांसारखी वैशिष्ट्येही देण्यात आली आहेत.शहरी भागातील दैनंदिन प्रवास, कार्यालयीन वापर, मुलांना शाळेत ने-आण किंवा शहराबाहेरील लांब प्रवासासाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. विशेषतः जास्त अंतर प्रवास करणाऱ्या ग्राहकांसाठी पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीमुळे मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. तसेच वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ आणि शाश्वत वाहतूक पर्याय म्हणूनही ही गाडी महत्त्वाची ठरणार आहे.
निसान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना २०१० साली झाली असून ती जपानमधील निसान मोटर कंपनी लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. ९० वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या या कंपनीने जागतिक स्तरावर अभियांत्रिकी कौशल्य आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रगत मोबिलिटी तंत्रज्ञान, उच्च कार्यक्षमतेची वाहने आणि विद्युतीकरणातील नेतृत्व यासाठी निसान ओळखली जाते. कंपनीची उपस्थिती जागतिक मोटरस्पोर्ट्समध्येही ठळक असून निसान लीफसारख्या पुरस्कारप्राप्त विद्युत वाहनांमुळे तिने वेगळा ठसा उमटवला आहे.
निसान मोटर इंडिया ६५ आंतरराष्ट्रीय ठिकाणांवरील देशांतर्गत आणि निर्यात बाजारपेठांना सेवा देते आणि सध्या जगभरात २,००,००० हून अधिक ग्राहकांसह निसान मॅग्नाइट आणि अगदी नवीन निसान ग्रॅव्हाइटची विक्री करते.नवीन सीएनजी रेट्रोफिटमेंट किटच्या माध्यमातून निसानने भारतीय ग्राहकांसाठी किफायतशीर, आरामदायी आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा एक नवा पर्याय उपलब्ध करून दिला असून भविष्यातील मोबिलिटीच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule