विजय तामिळनाडूमध्ये मोठा बदल घडवून आणेल, कुटुंबीयांचा विश्वास
चेन्नई , 04 मे (हिं.स.)।तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 चे निकाल अत्यंत धक्कादायक ठरले आहेत. पहिल्यांदाच पक्ष स्थापन करून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या सुपरस्टार विजय यांच्या तमिळगा वेत्री कळगम (टीव्हीके) पक्षाने सत्तेच्या अगदी जवळ मजल मारली आहे. त
विजय तामिळनाडूमध्ये मोठा बदल घडवून आणेल, कुटुंबीयांचा विश्वास


चेन्नई , 04 मे (हिं.स.)।तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 चे निकाल अत्यंत धक्कादायक ठरले आहेत. पहिल्यांदाच पक्ष स्थापन करून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या सुपरस्टार विजय यांच्या तमिळगा वेत्री कळगम (टीव्हीके) पक्षाने सत्तेच्या अगदी जवळ मजल मारली आहे. तमिळनाडूच्या राजकारणात हा मोठा बदल मानला जात आहे.या यशानंतर विजय यांच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया समोर आली असून टीव्हीके आघाडीवर असताना त्यांच्या कुटुंबीयांनी घरी शिट्या वाजवत आनंद साजरा केला.

विजय यांचे वडील एस. ए. चंद्रशेखर म्हणाले, “नक्कीच, तो तमिळनाडूमध्ये मोठा बदल घडवून आणेल.” तर आई शोभा चंद्रशेखर यांनी “मी खूप आनंदी आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.

तमिळनाडू विधानसभेच्या एकूण 234 जागांपैकी 109 जागांवर टीव्हीके आघाडीवर आहे. विजय यांच्या बहिणीने सांगितले की, “तो एक तरुण आणि ऊर्जावान व्यक्ती आहे. तमिळनाडूमधील लोक त्याच्याकडून मोठ्या बदलाची अपेक्षा करत आहेत आणि आम्हाला खात्री आहे की तो उत्तम कामगिरी करेल.”

विजय यांनी स्वतः पेरंबूर आणि तिरुची ईस्ट या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली असून, दोन्ही ठिकाणी ते विजयी होत असल्याचे दिसत आहे. टीव्हीके ने 234 पैकी 233 जागांवर उमेदवार उभे केले होते. तमिळनाडूमध्ये सुमारे 5 कोटी 73 लाख मतदार असून त्यापैकी सुमारे 2 कोटी 93 लाख महिला मतदार आहेत, ज्यांना टीव्हीके चा मुख्य पाठिंबा मानले जात आहे. AIADMK ला देखील महिला मतदारांचा काही प्रमाणात फायदा झाला आहे.

एकूणच, राज्यात तरुण आणि महिला मतदारांनी डीएमके ला नाकारल्याचे चित्र दिसत आहे. सेलम जिल्हा येथे टीव्हीकेने एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता, कारण त्यांच्या उमेदवाराचे नामांकन तांत्रिक कारणांमुळे रद्द झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande