
नवी दिल्ली, 04 मे (हिं.स.)। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील प्रस्तावित अतिवेगवान आणि सर्वाधिक वर्दळीच्या मार्गिका आणि इतर महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्ग मार्गिकांचा आढावा घेतला.
नवी दिल्ली येथे झालेल्या या आढावा बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक प्रमुख महामार्ग विकास प्रकल्पांवर चर्चा केली. यामध्ये नागपूर-भंडारा विभागाचे सहा पदरीकरण, तळोदा-बुऱ्हाणपूर विभागाचे चौपदरीकरण, दुर्ग-गडचिरोली-मंचेरियाल मार्गिका, गडचिरोली-कांकेर (रायपूर-विशाखापट्टणम ) मार्गिका, ग्वाल्हेर-नागपूर मार्गिका, नागपूर-हैदराबाद मार्गिका, भंडारा-रायपूर विभागाचे सहा पदरीकरण, लखनादौन-दुर्ग-रायपूर मार्गिका, नागपूर-अमरावती विभागाचे सहा पदरीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-44 वरील मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमा-नागपूर बायपास-बोरखेडी टप्पा आणि पुणे-सातारा विभागाच्या सहा पदरीकरणाचा समावेश आहे.
या आढावा बैठकीत महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील एकूण 527 किमी लांबीच्या नऊ राज्य बीओटी (बांधा-वापरा-हस्तांतरित करा) प्रकल्पांवरही चर्चा करण्यात आली. या प्रकल्पांमध्ये खालील मार्गिकांचा समावेश आहे:
शिरूर-अहिल्यानगर (4-पदरी)
अहिल्यानगर-वडाळा (4-पदरी)
वडाळा-छत्रपती संभाजीनगर (4-पदरी)
छत्रपती संभाजीनगर-जालना (4-पदरी)
जालना-वाटूर (4-पदरी)
नांदेड-नरसी-देगलूर (4-पदरी आणि 2-पदरी)
जाम-वरोरा (4-पदरी)
वरोरा-चंद्रपूर-बामणी (4-पदरी)
मलकापूर-चिखली (2-पदरी)
रस्तेमार्गांद्वारे संपर्कव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि प्रदेशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी प्रकल्पांचे नियोजन आणि अंमलबजावणी जलद करण्यावर या आढावा बैठकीत भर देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule