आरोग्य विद्यापीठाच्या ९ मे पासून पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा
नाशिक, 07 मे (हिं.स.) - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२६ टप्पा-१ मधील विविध लेखी परीक्षेचे संचलन, विद्यापीठाचे मा. कुलगुरु (अतिरिक्त कार्यभार) प्रा. श्री. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ०९ ते २० मे २०२६ दरम्यान महाराष
MUHS


नाशिक, 07 मे (हिं.स.) - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२६ टप्पा-१ मधील विविध लेखी परीक्षेचे संचलन, विद्यापीठाचे मा. कुलगुरु (अतिरिक्त कार्यभार) प्रा. श्री. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ०९ ते २० मे २०२६ दरम्यान महाराष्ट्र राज्यातील एकूण २९ परीक्षा केंद्रावर होणार आहे.

यामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमात एम.डी, एम.एस. आयुर्वेद, युनानी (२०२४), पदव्युत्तर वैद्यकिय अभ्यासक्रमात एम.डी., एम.एस., डी.एम., एम.सी.एच., पी.जी. डिप्लोमा, एम.एस्सी मेडिकल (बायोकेमिस्ट्री आणि मायक्रोबायोलॅाजी), एम.डी. होमिओपॅथी, एम.डी.एस., डिप्लोमा डेंटिस्ट्री, एम.डी., एम.एस. आयुर्वेदा आणि युनानी, एम.ओ.टी.एच., एम.पी.टी., एम.ए.एस.एल.पी., एम.एस्सी. (ऑडिओलॅाजी), एम.एस्सी. (एस.एल.पी.), एम.पी.ओ. यांचा समावेश आहे.

यामध्ये एकूण अंदाजे ३,५६० विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रविष्ट होणार आहे. यापुर्वी विद्यापीठाद्वारे हिवाळी - २०२४ टप्पा - ४, उन्हाळी - २०२५ व हिवाळी - २०२५ सत्राच्या सर्व टप्प्यातील विविध परीक्षेच्या अभ्यासक्रमांच्या प्रश्नप्रत्रिका ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षाकेंद्रावर पेपर सुरु होण्याआधी पाठविण्यात आलेल्या आहेत. तसेच ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करुन तपासण्याचे कार्यही यशस्वीरीत्या केलेले आहे. याचप्रमाणे उन्हाळी-२०२६ टप्पा-१ मधील परीक्षेच्या अभ्यासक्रमांच्या प्रश्नप्रत्रिका ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षाकेंद्रावर परीक्षेच्या दिवशी पाठविण्यात येणार असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी माहिती दिली.

वरील अभ्यासक्रमांच्या प्रश्नप्रत्रिका ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षाकेंद्रावर परीक्षेच्या दिवशी पाठविण्यात येणार असल्याने सर्व परीक्षार्थींनी परीक्षाकेंद्रावर एक तास आगोदर म्हणजेच सकाळ सत्रासाठी सकाळी ०९ः०० वाजता तसेच दुपारच्या सत्रासाठी दुपारी ०१ः०० वाजता रिपोर्ट करावे असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande