डोंबिवली पश्चिमेला कायमस्वरूपी आधार सेवा केंद्र सुरु
डोंबिवली, 07 मे (हिं.स.)। भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवली विधानसभा मतदार संघ आमदार रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून डोंबिवली पश्चिमेत नवीन विष्णूनगर पोलीस ठाण्याजवळ कायमस्वरूपी आधार सेवा केंद्र सुरू झाले आहे. या आधारकेंद्रामुळे पश्चिम विभागातील
Photo1


डोंबिवली, 07 मे (हिं.स.)।

भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवली विधानसभा मतदार संघ आमदार रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून डोंबिवली पश्चिमेत नवीन विष्णूनगर पोलीस ठाण्याजवळ कायमस्वरूपी आधार सेवा केंद्र सुरू झाले आहे. या आधारकेंद्रामुळे पश्चिम विभागातील नागरिकांची आधारकार्ड विषयीची कामे सुलभ होणार आहेत अशी माहिती नगरसेविका रसिका पाटील यांनी दिली. उद्घाटनप्रसंगीच आधारकार्ड कामासाठी लोकं मोठ्या संखेने आली होती.

पश्चिम विभागात पंडित दीनदयाळ रोडवर विष्णूनगर पोलिस ठाणे समोर असलेल्या या आधार सेवा केंद्राचे उद्घाटनप्रसंगी भाजपा पश्चिम मंडल अध्यक्षा प्रिया जोशी, भाजपा नगरसेविका रसिका कृष्णा पाटील, ज्योती पवन पाटील, हर्षाली हृदयनाथ भोईर, भाजपा पदाधिकारी कृष्णा पाटील, जुनी डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष पवन पाटील यांसह अनेक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी भाजपा नगरसेविका रसिका कृष्णा पाटील म्हणाल्या, पश्चिम डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कायमस्वरूपी आधार सेवा केंद्र सुरु झाले असून आता पश्चिम विभागातील नागरिकांना पूर्वेकडे जावे लागणार नाही त्यामूळे लोकांचा वेळही वाचेल. तर नगरसेविका हर्षाली हृदयनाथ भोईर म्हणाल्या या आधार केंद्राचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घेतला पाहिजे. तसेच पश्चिम मंडल अध्यक्ष जोशी म्हणाल्या जनसामान्यांच्या गरजा लक्षात घेऊन आमदार चव्हाण साहेबांनी हे कायमस्वरूपी आधारकेंद्र सुरू केले आहे त्याचा निश्चित फायदा होईल.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande