“तीन वर्ष झाली, जळगावातील त्या मुलीला न्याय मिळेल का? रोहित पवार आक्रमक
जळगाव, 07 मे (हिं.स.)राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी भडगाव येथे तीन वर्षांपूर्वी अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार व हत्या झाल्याची घटना घडली होती. त्या पीडित कुटुंबीयांची त्यांनी भेट
“तीन वर्ष झाली, जळगावातील त्या मुलीला न्याय मिळेल का? रोहित पवार आक्रमक


जळगाव, 07 मे (हिं.स.)राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी भडगाव येथे तीन वर्षांपूर्वी अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार व हत्या झाल्याची घटना घडली होती. त्या पीडित कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत महिला सुरक्षा, फास्टट्रॅक कोर्ट, शक्ती कायदा आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे 2023 मध्ये घडलेली सात वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार व हत्येची घटना आजही महाराष्ट्राच्या स्मरणात ताजी आहे. या अमानुष घटनेनंतर संपूर्ण राज्य पीडित कुटुंबाच्या बाजूने उभे राहिले होते. न्याय मिळावा यासाठी त्या वेळी फास्टट्रॅक कोर्टाची घोषणा करण्यात आली होती. पुण्यातल्या प्रकरणात देखील फास्टट्रॅक कोर्ट आहे. फास्टट्रॅक कोर्टचा फायदा होतो का हे जर बघायचं असेल तर गोंडगाव मधील घटना आपण बघितली पाहिजे. तीन वर्ष होऊन सुद्धा फास्टट्रॅक कोर्टमध्ये अजून पर्यंत न्याय मिळाला नाही नसल्याचं रोहित पवार म्हणाले. आज परिवाराला भीती वाटत आहे त्या मुलीला न्याय मिळेल का? कायदा खरच गरीबाच्या बाजूने आहे का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. मी सरकारला विनंती करेल 2019 मध्ये आणलेला शक्ती कायदा लागू करा, त्यात अजून काही गोष्टी कडक कराव्यात. त्या कायद्याच्या माध्यमातून लोकांना असं कृत्य करताना भीती वाटेल, लहान मुली आणि महिलांवर होणारे अत्याचार कुठेतरी कमी होतील. या प्रकरणांमध्ये कुठेही राजकारण न आणता परिवाराला न्याय मिळावा हा आमचा प्रयत्न आहे. असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande