नरसापूरच्या पीडित बालिकेला न्यायासाठी परतवाड्यातून एल्गार!
अमरावती, 07 मे (हिं.स.)। पुणेजवळील नरसापूर येथे एका 65 वर्षीय नराधमाने 4 वर्षीय निष्पाप बालिकेवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेविरोधात संतापाची लाट उसळली असून,
नरसापूरच्या अमानवीय अत्याचाराविरोधात संतापाचा ज्वालामुखी  पीडित बालिकेला न्यायासाठी परतवाड्यातून एल्गार!


अमरावती, 07 मे (हिं.स.)।

पुणेजवळील नरसापूर येथे एका 65 वर्षीय नराधमाने 4 वर्षीय निष्पाप बालिकेवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेविरोधात संतापाची लाट उसळली असून, अचलपूर परतवाड्यातही तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रीय ब्राह्मण मंडळ, परतवाडा यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी, अचलपूर यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात आरोपीविरुद्ध खटला जलदगती न्यायालयात चालवून त्याला कठोरात कठोर—फाशीची शिक्षा देण्याची ठाम मागणी करण्यात आली.मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत म्हटले की, “अशा नराधमांना समाजात कोणतीही जागा नाही. एका निष्पाप बालिकेचे आयुष्य संपवणाऱ्याला तात्काळ आणि कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अन्यथा कायद्यावरील विश्वास डळमळीत होईल.” समाजातील महिलांवर आणि लहान मुलींवर वाढत्या अत्याचारांच्या घटनांकडे गांभीर्याने पाहून शासनाने अधिक कठोर पावले उचलावीत, अशीही मागणी करण्यात आली.निवेदनाद्वारे प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला की, या प्रकरणात विलंब किंवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. पीडित बालिकेला न्याय मिळवून देण्यासाठी समाज एकवटला असून, दोषींना शिक्षा होईपर्यंत लढा सुरूच राहील.या वेळी मंडळाच्या अध्यक्षा सौ. पल्लवी धर्माधिकारी, सचिव नितीन काशीकर, डॉ वनश्री देशपांडे, डॉ. रवींद्र खजुरकर, विजय धर्माधिकारी, सतीश जोशी आदी उपस्थित होते.“निष्पाप बालिकेला न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही!” तिला यूपी स्टाईल न्याय मिळवून द्यावा अशा संतप्त प्रतिक्रिया उपस्थितितांकडून उमटत होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande