
छत्रपती संभाजीनगर, 11 जून, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश लोखंडे यांच्या प्रचारासाठी आमदार अंबादास दानवे यांनी जिल्ह्यातील नगरपालिका व जिल्हा परिषद सदस्य मतदारांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी गणेश लोखंडे यांना प्रथम पसंतीचे मतदान करण्याचे आवाहन केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांची जाण, विकासाची दृष्टी आणि सर्वसमावेशक नेतृत्वगुण लक्षात घेता लोखंडे यांना विजयी करण्याची जबाबदारी मतदारांनी घ्यावी, असे दानवे यांनी सांगितले. या संवाद कार्यक्रमास महाविकास आघाडीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis