विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे 17 जूनला ठाण्यात पुरस्कारप्राप्त एकांकिकांचा महोत्सव
ठाणे, 11 जून (हिं.स.) - दिवंगत अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते विनय आपटे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे पुरस्कारप्राप्त एकांकिकांचा महोत्सव आयोजित केला आहे. येत्या १७ जून रोजी रात्री ८ वाजता गडकरी रंगायतन, ठाणे येथे हा
एकांकिका महोत्सव


ठाणे, 11 जून (हिं.स.) - दिवंगत अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते विनय आपटे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे पुरस्कारप्राप्त एकांकिकांचा महोत्सव आयोजित केला आहे. येत्या १७ जून रोजी रात्री ८ वाजता गडकरी रंगायतन, ठाणे येथे हा महोत्सव होणार आहे.

यावर्षी सवाई एकांकिका स्पर्धा, मृंनळताई करंडक, स्पंदन एकांकिया स्पर्धा आणि लोकांकिका अश्या अनेक स्पर्धांमध्ये प्रथम पुरस्कार मिळालेल्या “जब वी मेटा“ या विलेपार्ले येथील म. ल. डहाणूकर महाविद्यालयाची एकांकिका सादर होणार आहे. सर्वेश देसाई यांनी या एकांकिकेचे लेखन केले असून पराग ओझा यांनी दिग्दर्शन केले आहे.

दुसरी एकांकिका आहे ठाण्याच्या जोशी बेडेकर स्वायत्त महाविद्यालयाची “मढ निघलय अनुदानाला“ या एकांकिकेने आयएनटी, अटळ करंडक, रंगायतन करंडक, कोंकण चषक, अमर हिंद एकांकिका स्पर्धा अश्या स्पर्धेत अनेक पारितोषिके मिळवली आहेत. लेखक –प्रतीक चौधरी आणि दिग्दर्शन महेश कपरेकर आणि सागर चव्हाण यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande