महेश बाबूंची खास प्रस्तुती; ‘राव बहादूर’चा टीझर चर्चेत
मुंबई, 13 जून, (हिं.स.)। दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यांच्या प्रस्तुतीखाली तयार झालेल्या बहुप्रतीक्षित ''राव बहादूर'' या चित्रपटाचा नवा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. व्यंकटेश महा दिग्दर्शित या
महेश बाबूंची खास प्रस्तुती; ‘राव बहादूर’चा टीझर चर्चेत


मुंबई, 13 जून, (हिं.स.)। दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यांच्या प्रस्तुतीखाली तयार झालेल्या बहुप्रतीक्षित 'राव बहादूर' या चित्रपटाचा नवा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. व्यंकटेश महा दिग्दर्शित या सायकोलॉजिकल ड्रामा चित्रपटात सत्यदेव मुख्य भूमिकेत आहेत. ३ जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या टीझरमध्ये रहस्य, भ्रम आणि मानसिक संघर्षांनी भरलेल्या एका वेगळ्या जगाची झलक पाहायला मिळते.

महेश बाबूंनी हा टीझर शेअर करताना, लक्षात ठेवा... हा फक्त एक टीझर आहे, असे लिहित संपूर्ण टीमचे कौतुक केले. 'जस्ट अ टीझर' नावाने प्रदर्शित करण्यात आलेल्या या झलकमध्ये सत्यदेव बहादूर राजकुमार या भूमिकेत दिसत आहेत.

टीझरची कथा एका अशा व्यक्तीभोवती फिरताना दिसते, जो भीती, भ्रम आणि संशयाच्या जाळ्यात अडकलेला आहे. संशय हेच सर्वात मोठे भूत आहे ही संकल्पना चित्रपटात ठळकपणे मांडण्यात आली असून, त्यामुळे हा चित्रपट रहस्यमय आणि मनोवैज्ञानिक ड्रामा म्हणून अधिक प्रभावी ठरत आहे. भव्य दृश्यरचना, शाही वातावरण आणि सत्यदेव यांचा बदललेला लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

चित्रपटातील पहिले गाणे 'ओ सुंदरी' यापूर्वीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. सत्यदेव आणि दीपा थॉमस यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे रोमँटिक गाणे त्याच्या मधुर संगीत आणि पीरियड सेटिंगसाठी विशेष कौतुकास पात्र ठरले आहे.

या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन आणि संकलनाची जबाबदारी वेंकटेश महा यांनी सांभाळली आहे. तर छायांकन कार्तिक परमार यांनी आणि संगीत स्मरण साई यांनी दिले आहे. रहस्य, भावना आणि भव्यतेचा अनोखा संगम असलेला राव बहादूर हा यंदाच्या वर्षातील सर्वात उत्सुकता निर्माण करणाऱ्या तेलुगू चित्रपटांपैकी एक मानला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande