
मुंबई, 14 जून (हिं.स.)। लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती आणि तिचे पती सुमित सुरी यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या घरी एका चिमुकलीचे आगमन झाले आहे. सुरभी आणि सुमित यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली.
मुलीच्या जन्माची बातमी समजताच मनोरंजन क्षेत्रातील कलाकार आणि चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला.
इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर करत सुरभी आणि सुमित यांनी लिहिले, आमच्या मुलीचे आगमन झाले आहे. आमची हृदये प्रेम आणि कृतज्ञतेने भरून गेली आहेत.
या जोडप्याने सांगितले की, त्यांच्या मुलीचा जन्म १३ जून २०२६ रोजी झाला. या पोस्टसोबत त्यांनी एका सुंदर फिकट गुलाबी रंगाचे कार्डही शेअर केले, ज्यावर गुलाबाचे चित्र आणि 'इट्स अ गर्ल' (मुलगी झाली आहे), १३ जून २०२६, प्रेम - सुरभी आणि सुमित, असा संदेश होता.
या आनंदाच्या बातमीनंतर सोशल मीडियावर अभिनंदनाच्या संदेशांचा पूर आला. अभिनेत्री किशवर मर्चंटने कमेंट्समध्ये शुभेच्छा दिल्या, तर आष्का गोराडियासह अनेक टीव्ही कलाकार आणि चाहत्यांनी या नवीन पालकांवर प्रेम आणि आशीर्वादाचा वर्षाव केला. सुरभी आणि सुमित यांच्या आयुष्यातील या नवीन टप्प्याबद्दल चाहत्यांमध्येही प्रचंड उत्साह दिसून येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर