मुंबई लोकल ट्रेनमध्ये एका प्रवाशाची चाकू भोसकून हत्या
मुंबई, 24 जून (हिं.स.)। मुंबई लोकल ट्रेनमध्ये झालेल्या भांडणानंतर एका प्रवाशाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली आणि एक व्यक्ती घटनास्थळावरून पळून गेला. बोरीवली शासकीय रेल्वे पोलीस (जीआरपी) या घटनेचा तपास करत आहे. हल्लेखोर आरोपीची ओळख पटली असून, त्याल
mh murder mumbai local TRAIN


मुंबई, 24 जून (हिं.स.)। मुंबई लोकल ट्रेनमध्ये झालेल्या भांडणानंतर एका प्रवाशाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली आणि एक व्यक्ती घटनास्थळावरून पळून गेला. बोरीवली शासकीय रेल्वे पोलीस (जीआरपी) या घटनेचा तपास करत आहे. हल्लेखोर आरोपीची ओळख पटली असून, त्याला पकडण्यासाठी रेल्वे पोलिसांनी सात पथक तैनात केल्याची माहिती बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दत्ता खुपरेकर यांनी दिलीय.

बोरीवली जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता खुपरेकर यांनी सांगितले की, मयंक लोहार (२२) मंगळवारी रात्री १०:४२ वाजता अंधेरी स्टेशनवरून ट्रेनमध्ये चढला. अंधेरी आणि बोरीवली दरम्यानच्या पावसाळी रेल्वे प्रवासादरम्यान, डब्याचा दरवाजा बंद करण्यावरून प्रवाशांमध्ये वाद झाला. या वादादरम्यान, दुसऱ्या एका प्रवाशाने कथितरित्या लोहारच्या पोटात चाकूने वार केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला.

रात्री ११:०४ वाजता ट्रेन बोरीवली स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर पोहोचली, त्यानंतर ट्रेन पूर्णपणे थांबण्यापूर्वीच आरोपी पळून गेला. त्यानंतर, रात्री ११:०७ वाजता, जीआरपी आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांचे एक पथक डब्याजवळ पोहोचले आणि त्यांनी जखमी प्रवाशाला मदत केली. रात्री ११:१० वाजता, एक वैद्यकीय मदत पथक दाखल झाले आणि त्यांनी लोहार यांना बोरीवली स्टेशनवरील आपत्कालीन वैद्यकीय कक्षात नेले, जिथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि त्यानंतर त्यांना कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आले. शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी मयंक लोहार यांचे निधन झाले.

दत्ता खुपरेकर यांनी सांगितले की, आरोपीची ओळख पटवण्यासाठी तपास अधिकारी सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. त्याने काळ्या रंगाचा शर्ट आणि काळी पँट घातली होती आणि त्याच्याकडे चाकू होता. पोलीस त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, मृत व्यक्ती विरारचा रहिवासी होता आणि अंधेरीतील वेस्टसाइड स्टोअरमध्ये काम करत होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande