एकूण १.२५ कोटींचा निधी खर्च करून एकाच वेळी विविध पाच मोठ्या कामांना गती
छत्रपती संभाजीनगर, 25 जून (हिं.स.)। औरंगपूर परिसरात एकूण १ कोटी २५ लाख रुपयांचा निधी खर्च करून एकाच वेळी विविध पाच मोठ्या कामांना गती देण्यात आली आहे. यामध्ये दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या ५० लाख रुपयांच्या सय्यदपूर-औरंगपूर रस्ते कामाच्
अ


छत्रपती संभाजीनगर, 25 जून (हिं.स.)।

औरंगपूर परिसरात एकूण १ कोटी २५ लाख रुपयांचा निधी खर्च करून एकाच वेळी विविध पाच मोठ्या कामांना गती देण्यात आली आहे. यामध्ये दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या ५० लाख रुपयांच्या सय्यदपूर-औरंगपूर रस्ते कामाच्या भूमिपूजनासह, आमदार निधीतून २५ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या कालिका माता सभागृहाचे मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले. तसेच गावांतर्गत दळणवळण सुलभ व्हावे म्हणून अहिल्यादेवी चौक ते मारोती मंदिर दरम्यान २० लाख रुपयांच्या सिमेंट रस्त्याचे काम आणि दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत प्रेमवस्ती पेठावर २० लाख रुपयांच्या सिमेंट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यासोबतच अल्पसंख्याक विकास निधीतून बागवान गल्लीत १० लाख रुपये खर्चाचे पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामालाही मंजुरी देऊन त्याचा प्रारंभ करण्यात आला आहे.

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली. ग्रामीण भागातील रस्ते, अंतर्गत सिमेंट रस्ते आणि सामाजिक सभागृहांची उभारणी करून सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुकर करणे हेच आपले मुख्य ध्येय आहे. मतदारसंघातील एकही घटक किंवा गाव विकासापासून वंचित राहणार नाही, यासाठी आपला शासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, असा विश्वास नागरिकांना दिला..

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande