
छत्रपती संभाजीनगर, 25 जून, (हिं.स.)। सिल्लोड–सोयगावच्या जलसंधारणाच्या विकासासाठी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक आमदार अब्दुल सत्तार यांच्या समवेत मंत्री संजय राठोड यांची झाली.
मुंबई येथील शिवनेरी बंगल्यावर महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची भेट घेऊन सिल्लोड–सोयगाव मतदारसंघातील सिमेंट नाला बंधारे, खोलीकरणाची कामे तसेच विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली.
मतदारसंघातील जलसंधारण व विकासकामांना गती देण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली असून यावेळी सदरील विकासकामे तातडीने मार्गी लावण्यासाठी मंत्री संजय राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis