जळगावात सोने १,३३९ रुपयांनी, तर चांदी ६,१८० रुपयांनी महागली
जळगाव, 26 जून (हिं.स.) | शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सलग तीन दिवस सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र, आज शुक्रवारी सकाळी बाजारपेठ उघडताच दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींत पुन्हा मोठी वाढ दिसून आली. यामुळे गे
gold and silver


जळगाव, 26 जून (हिं.स.) | शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सलग तीन दिवस सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र, आज शुक्रवारी सकाळी बाजारपेठ उघडताच दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींत पुन्हा मोठी वाढ दिसून आली. यामुळे गेल्या काही दिवसांपासून स्वस्त दरात दागिने खरेदीची वाट पाहणाऱ्या ग्राहकांना चांगलाच झटका बसला आहे.

जळगाव सराफ बाजारात शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १,३३९ रुपयांची वाढ झाली असून जीएसटीसह सोन्याचा भाव १ लाख ४६ हजार ५४ रुपये इतका झाला आहे. तर चांदीच्या दरातही मोठी उसळी पाहायला मिळाली. प्रति किलो ६,१८० रुपयांची वाढ झाल्याने जीएसटीसह चांदीचा दर २ लाख ३५ हजार ८७० रुपये इतका झाला आहे. गेल्या तीन दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली होती. मात्र जागतिक बाजारात सुधारणा झाल्याने त्याचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावर दिसून आला आणि दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरांनी पुन्हा वाढीचा मार्ग धरला.

सराफा व्यावसायिकांच्या मते, आगामी काळात जागतिक आर्थिक परिस्थिती, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे व्याजदर धोरण, डॉलरची स्थिती आणि भू-राजकीय घडामोडींवर सोन्या-चांदीच्या किमतींची दिशा अवलंबून राहणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस दरांमध्ये चढ-उतार कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande