ऑपरेशन कवच - चांदूर बाजारात जनजागृती पोलिसांची भव्य बाइक रॅली
अमरावती, 26 जून (हिं.स.) अमली पदार्थां विरोधात जनजागृती करण्यासाठी ऑपरेशन कवच अभियान अंतर्गत आज चांदूर बाजार पोलीस स्टेशनच्या वतीने भव्य बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली
ऑपरेशन कवच; चांदूर बाजारात जनजागृती पोलिसांची भव्य बाइक रॅली


अमरावती, 26 जून (हिं.स.)

अमली पदार्थां विरोधात जनजागृती करण्यासाठी ऑपरेशन कवच अभियान अंतर्गत आज चांदूर बाजार पोलीस स्टेशनच्या वतीने भव्य बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अशोक जाधव यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड यांच्या सहभागाने काढण्यात आली रॅलीची सुरुवात पोलीस स्टेशन येथून होऊन जयस्तंभ चौक, यंग स्टार चौक, नेताजी चौक, बेलोरा चौक, संगेकर मंगल कार्यालय परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून ही रॅली काढण्यात आली होती यावेळी नागरिकांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागरूक करण्यात आले तसेच बस डेपो परिसरासह गर्दीच्या ठिकाणी ऑपरेशन कवच अभियानाचा संदेश देणारा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला या माध्यमातून नागरिकांनी अमली पदार्थमुक्त समाज घडविण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande