परळीत मित्राची दगडाने ठेचून हत्या; रेल्वे रुळावर मृतदेह ठेवून आत्महत्येचा रचला बनाव
बीड, 04 जून (हिं.स.)। परळी परिसरात पैशांच्या किरकोळ देवाणघेवाणीच्या वादातून ३६ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी खून केल्यानंतर मृतदेह रेल्वे रुळावर ठेवून आत्महत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न के
परळीत मित्राची दगडाने ठेचून हत्या; रेल्वे रुळावर मृतदेह ठेवून आत्महत्येचा रचला बनाव


बीड, 04 जून (हिं.स.)।

परळी परिसरात पैशांच्या किरकोळ देवाणघेवाणीच्या वादातून ३६ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी खून केल्यानंतर मृतदेह रेल्वे रुळावर ठेवून आत्महत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला, मात्र मोकाट कुत्र्यांनी मृतदेह बाजूला ओढल्यामुळे हा संपूर्ण डाव फसला. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी वेगाने कारवाई करत मयताच्या दोन मित्रांना अटक केली आहे. परळी तालुक्यातील वरवटी आणि लेंडेवाडी शिवारात ही घटना घडली असून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत आणि आरोप हे एकमेकांचे जिवलग मित्र होते. तिघे कारमधून परळी तालुक्यातील वरवटी शिवारात गेले होते. तिथे त्यानंतर त्यांनी दारूची पार्टी केली. या पार्टीदरम्यान पैशांच्या देवाणघेवाणीवरून तिघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका चिघळला बाजूला पडलेला मोठा दगड उचलून डोक्यात मारला.बेशुद्ध पडल्यानंतरही नशेत असलेल्या आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटना घडल्यानंतर घाबरलेले आरोपी मृतदेहाजवळच थांबले होते. त्यानंतर त्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी आणि रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याचा भास निर्माण करण्यासाठी त्याचा मृतदेह कारमध्ये टाकला. त्यांनी हा मृतदेह लेंडेवाडी शिवारातील रेल्वे रुळावर नेऊन ठेवला आणि तेथून पळ काढला. मात्र, आरोपी निघून गेल्यानंतर परिसरातील मोकाट कुत्र्यांनी मृतदेह ओढत रेल्वे रुळांच्या बाहेर आणला. रक्ताने माखलेला मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आल्यानंतर परळी परिसरात खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे परळी ग्रामीण पोलिसांनी संशयितयांना ताब्यात घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande