लातूर जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयात अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा निवेदनाद्वारे मागणी
लातूर, 04 जून (हिं.स.)। लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये व तहसील कार्यालयामध्ये अनेक कर्मचारी अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडूण आहेत, त्यांच्या बदल्या करण्याची मागणी संभाजी सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. लातूर
निवेदन


लातूर, 04 जून (हिं.स.)।

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये व तहसील कार्यालयामध्ये अनेक कर्मचारी अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडूण आहेत, त्यांच्या बदल्या करण्याची मागणी संभाजी सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अनेक कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून ठाण मांडून बसले आहेत. बदली अधिनियमामध्ये मुख्यालय बदलीची तरतुद असतांना फक्त डी.डी.ओ. बदल करुन सेवावर्ग करुन प्रतिनियुक्ती करुन ठाण मांडून

बसलेले कर्मचारी अशीच बाब कांही तहसील कार्यालयामध्ये पण आहे. या कर्मचाऱ्यांच्या सेवा तपशील पाहुन तात्काळ त्यांच्या बदल्या करण्यात याव्यात व सेवावर्ग प्रतिनियुक्ती रद्द करण्यात याव्यात. वरील उल्लेख केलेली मागणी येणाऱ्या १० दिवसात जर पुर्ण नाही झाली तर संभाजी सेना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करेल, असा इशारा दिला.

या निवेदनावर संभाजी सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश देशमुख, वि. आ जिल्हा संघटन प्रमुख पसाद पवार, वि. आ जिल्हाध्यक्ष अमोल कांदे, जिल्हा सचिव गजानन मुंगळे, जिल्हा कार्याध्यक्ष मंगेश निकम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande