

नाशिक, 04 जून (हिं.स.)।
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, १५ वर्षांखालील मुलींच्या आमंत्रितांच्या अव्वलसाखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशनसुपर लीग ) स्पर्धेत , नाशिक जिल्हा संघाने कोल्हापूरवर ३३ धावांनी विजय मिळवला.काव्या दिघेने फलंदाजीत तरआर्या गाडगीळनेगोलंदाजीत भरीव कामगिरी करून विजयात प्रमुख वाटा उचलला.
आमंत्रितांच्या स्पर्धेत पुणे येथे झालेल्या ३५ षटकांच्या सामन्यात नाशिकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली.यष्टीरक्षक काव्या दिघे ५७ व कर्णधार आराध्या बोटवे ३४ धावा , यांच्याफलंदाजीच्या जोरावर नाशिकने ३५ षटकांत ९ बाद १८७ धावा केल्या. उत्तरादाखल नाशिकच्या गोलंदाजांनी कोल्हापूरला ३५ षटकांत ९ बाद १५४ इतकीच मजल मारून दिली. यात ऑफ स्पिनरआर्या गाडगीळने ३ तर मध्यमगतीप्रतिक्षा देशमुख, नक्षत्रा आगळेवसंस्कृती कंटकने प्रत्येकी १ बळी घेतला व नाशिकला ३३ धावांनी विजयी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV