रत्नागिरीत घरात घुसून बिबट्याचा हल्ला; दोघे जखमी
रत्नागिरी, 4 जून (हिं.स.) । बेनी बुद्रुक (ता. लांजा) येथील कुसुममळेवाडीमध्ये बुधवारी रात्री घरात घुसलेल्या बिबट्याने ५२ वर्षीय व्यक्तीवर हल्ला केला. या हल्ल्यात संबंधित व्यक्ती जखमी झाली असून मदतीसाठी धावलेल्या १९ वर्षीय युवकालाही दुखापत झाली आहे.

बुधवारी रात्री सुमारे ९.१५ वाजण्याच्या सुमारास बिबट्या घराच्या पाठीमागील बाजूने घरात शिरला. अचानक समोर आलेल्या बिबट्याने घरातील ५२ वर्षीय व्यक्तीवर झडप घातली. अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबीयांमध्ये एकच गोंधळ उडाला.

आरडाओरडा ऐकून मदतीसाठी धावलेल्या १९ वर्षीय युवकावरही बिबट्याने हल्ला केल्याने तो जखमी झाला. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जखमींना उपचारासाठी वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली.

या घटनेनंतर कुसुमळेवाडीसह बेनी बुद्रुक परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा वाढता वावर आणि थेट घरात घुसून झालेला हल्ला यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

नागरिकांनी रात्रीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी

 rajesh pande