लातूर शहर विकास आराखड्यासाठी नागरिकांकडून सूचना मागविण्याचे आवाहन
लातूर , 06 जून (हिं.स.) : लातूर शहर महापालिकेच्या वतीने शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, या संदर्भात नागरिकांनी आपापल्या सूचना व अपेक्षा नोंदवाव्यात, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या सर्वसाधार
महानगरपालिका


लातूर , 06 जून (हिं.स.) : लातूर शहर महापालिकेच्या वतीने शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, या संदर्भात नागरिकांनी आपापल्या सूचना व अपेक्षा नोंदवाव्यात, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने 2023 मध्ये प्रारूप विकास योजना तयार करण्यास मान्यता दिली होती. सध्या या योजनेचे काम प्रगतीपथावर असून शहर व परिसरातील नागरिक, व्यावसायिक, मालमत्ताधारक, विकसक तसेच विविध विभागांना त्यांच्या सूचना सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन सार्वजनिक सुविधांसाठी आवश्यक असलेली नवीन आरक्षणे, पाणीपुरवठा व्यवस्था, ड्रेनेज प्रणाली, स्मशानभूमी, दुकाने, नवीन रस्ते तसेच इतर नागरी सुविधा याबाबत सूचना मागविण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या माहितीनुसार, या संदर्भातील प्रश्नावली 08 जून रोजी कार्यालयीन वेळेत उपलब्ध करून दिली जाणार आहे. नागरिकांनी आपली मते व सूचना लेखी स्वरूपात भरून नगर रचना विभागात 09 व 10 जून रोजी कार्यालयीन वेळेत जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या सूचनांच्या आधारे लातूर शहराचा विकास आराखडा अधिक सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख पद्धतीने तयार करण्यास मदत होणार असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande