
रत्नागिरी, 6 जून (हिं.स.) ।शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आज रत्नागिरीत भारतीय जनता पक्षातर्फे रत्नदुर्ग किल्ला आणि श्री भगवती देवी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
या ऐतिहासिक वास्तूचे पावित्र्य जपण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी किल्ल्यावर आलेल्या काही पर्यटकांनीही उत्स्फूर्तपणे या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. या वेळी मंदिर परिसर, तसेच किल्ल्याच्या तटबंदीतील प्लास्टिक बाटल्या, कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली.
शिवछत्रपतींचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून गड-किल्ले स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. यापुढेही असे उपक्रम राबवू, असे शहर सरचिटणीस नीलेश आखाडे यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, शहर सरचिटणीस नीलेश आखाडे, संदीप सुर्वे यांच्या पुढाकाराने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक नितीन जाधव, नगरसेवक संदीप सुर्वे, संतोष सावंत, प्रसाद बाष्टे, नितीन गांगण, शेखर लेले, सचिन गांधी, आशिष मोरे, प्रशांत घाणेकर, मंदार भोळे, निखिल घाग, विजय माळवदे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संकेत कदम, शुभम धामणस्कर, विक्रांत वाडकर, वरद लिमये, स्वप्नील गार्डी, सुमित जाधव, मिहिर कांबळे, राहील जमादार, अक्षय जाधव, अवधूत लिंगायत, आर्यन नारकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी