लहवित खूनप्रकरणातील फरार आरोपी मध्यप्रदेशातून जेरबंद
गुन्हेशाखा युनिट-२ची कामगिरी ; संशयित देवळाली कॅम्प पोलीसांच्या ताब्यात देवळाली कॅम्प, 11 जुलै (हिं.स.)। देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील लहवित येथे खून करून मागील दोन वर्षांपासून फरार असलेला आरोपी गुलाबसिंग मांगीलाल आखाडे याला मध्यप्रदेशातील
लहवित खूनप्रकरणातील फरार आरोपी मध्यप्रदेशातून जेरबंद


गुन्हेशाखा युनिट-२ची कामगिरी ; संशयित देवळाली कॅम्प पोलीसांच्या ताब्यात

देवळाली कॅम्प, 11 जुलै (हिं.स.)। देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील लहवित येथे खून करून मागील दोन वर्षांपासून फरार असलेला आरोपी गुलाबसिंग मांगीलाल आखाडे याला मध्यप्रदेशातील मंडलेश्वर येथून जेरबंद करण्यात गुन्हेशाखा युनिट-२ला यश आले आहे.

लहवित येथील रेल्वे पोल क्रमांक १७४/१३१५ जवळ फिर्यादी यांचे वडील ७ डिसेंबर २०२३ रोजी काम करत असताना आरोपी गुलाबसिंग आखाडे याने लोखंडी पहारीने त्यांच्या डोक्यावर व पाठीवर वार करून गंभीर जखमी केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुरनं. १०२/२०२४ भादंवि कलम ३०२, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी फरार आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्यानंतर गुन्हेशाखा युनिट-२च्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात असल्याचे निष्पन्न केले.

. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, गुन्हे तसेच संदीप मिटके, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट-२चे पथक मध्यप्रदेशात रवाना करण्यात आले. श्रेणी पोउनि/मुक्तारखान पठाण, सपोउपनि/गुलाब सोनार, पोहवा/प्रदीप नन्नवरे, पोअं/संतोष सुपेकर व चापोअं/जितेंद्र वजीरे यांनी शोध घेत ग्राम चोली, पोस्ट मंडलेश्वर, ता. माहेश्वर, जि. खरगोन, मध्यप्रदेश येथून आरोपी गुलाबसिंग मांगीलाल आखाडे (वय ५० वर्षे, रा. ग्राम बेरछा, पोस्ट सिवाना, ता. भिकनगाव, जि. खरगोन, मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले.चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला पुढील कारवाईसाठी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande