बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात आणखी एक संशयित ताब्यात
नाशिक, 11 जुलै (हिं.स.) :राज्यभर गाजलेल्या १६० कोटी रुपयांच्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात विशेष तपास पथकाने (एसआयटी) आणखी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. प्रशांत तुळशीराम वाडीले (रा. धुळे) याला पोलिसांनी धुळे शहरातून ताब्यात घेतले.या प
बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात आणखी एक संशयित ताब्यात


नाशिक, 11 जुलै (हिं.स.) :राज्यभर गाजलेल्या १६० कोटी रुपयांच्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात विशेष तपास पथकाने (एसआयटी) आणखी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. प्रशांत तुळशीराम वाडीले (रा. धुळे) याला पोलिसांनी धुळे शहरातून ताब्यात घेतले.या प्रकरणात यापूर्वी १,१९९ संशयितांविरुद्ध नाशिकरोड न्यायालयात तब्बल १,१०० पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे प्रशांत वाडीले हा धुळे येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर नियोजनबद्ध कारवाई करत एसआयटीच्या पथकाने धुळे येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

एटीएसचे प्रमुख तपास अधिकारी तथा सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या मोहिमेत हवालदार कराड, गिते, येवले तसेच अंबड गुन्हे शाखा युनिट-३चे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, हवालदार बोडके, पचलोरे आणि महाले यांनी सहभाग घेतला.

ताब्यात घेतलेल्या संशयित प्रशांत वाडीले याला नाशिक येथे आणण्यात आले असून, शनिवारी (१२ जुलै) त्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

----------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande