रोह्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह; पतीसह पाच जणांविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा
रायगड, 11 जुलै (हिं.स.)। कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुगाव आदिवासीवाडी येथे अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून दिल्याचा आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोलाड पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय
Child-marriage-of-a-minor-girl


रायगड, 11 जुलै (हिं.स.)। कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुगाव आदिवासीवाडी येथे अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून दिल्याचा आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोलाड पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, बालविवाह प्रतिबंध अधिनियम आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी क्रमांक १ हे नात्याने पती-पत्नी आहेत. फिर्यादी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही आरोपी क्रमांक २ ते ५ यांनी संगनमत करून तिचा बालविवाह रोहा तालुक्यातील नडवली आदिवासीवाडी येथे आरोपी क्रमांक १ याच्याशी लावून दिला. त्यानंतर आरोपी क्रमांक १ याला फिर्यादी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही त्याने तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. त्यातून फिर्यादी गर्भवती झाली आणि तिने एका मुलीला जन्म दिला. त्यामुळे ती अल्पवयातच माता बनली.

या प्रकरणी कोलाड पोलीस ठाणे गुरनं.96/2026, भा.न्या.संहिता 2023 चे कलम 64(2)ह्आयह,

65(1),3(5) सह बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006चे कलम 9,10 सह लैगिंक अपराधापासुन

बालकांचे सरंक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,6,8,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून

अधिक तपास पोसई/महाडिक हे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande