विम्बल्डन २०२६: पुन्हा एकदा तरी पुनरागमन करायचंय - जोकोविच
लंडन 11 जुलै (हिं.स) विम्बल्डन 2026 च्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या इटलीच्या यानिक सिनरकडून सरळ सेटमध्ये पराभूत होऊनही सर्बियाचा खेळाडू नोव्हाक जोकोविचने निवृत्तीचा अंदाज फेटाळून लावला. 39 वर्षीय सर्बियन स्टारने स्
नोव्हाक जोकोविच


लंडन 11 जुलै (हिं.स) विम्बल्डन 2026 च्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या इटलीच्या यानिक सिनरकडून सरळ सेटमध्ये पराभूत होऊनही सर्बियाचा खेळाडू नोव्हाक जोकोविचने निवृत्तीचा अंदाज फेटाळून लावला.

39 वर्षीय सर्बियन स्टारने स्पष्ट केले की, त्याला अजूनही टेनिस खेळायचे आहे आणि पुढील वर्षी विम्बल्डनमध्ये परतण्याची आशा आहे.

सात वेळचा विम्बल्डन चॅम्पियन जोकोविच सेंटर कोर्टमधून बाहेर पडत असताना प्रेक्षकांनी उभे राहून त्याला अभिवादन केले. यानंतर, पुढील वर्षी वयाच्या ४० व्या वर्षी विम्बल्डनच्या 150 व्या आवृत्तीत खेळणार का असे विचारले असता, तो म्हणाला, मला आणखी एकदा तरी परत यायचे आहे. पुढे काय होते ते पाहूया.

या पराभवामुळे जोकोविचला त्याचे विक्रमी २५वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आणि ३९वे ग्रँडस्लॅम अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. मात्र, उपांत्य फेरी गाठणे हे सिद्ध करते की तो अजूनही जगातील सर्वोत्तम खेळाडूंशी टक्कर देण्यास सक्षम आहे.

नक्कीच मी निराश झालो आहे. मला विम्बल्डन जिंकायचे होते आणि म्हणूनच मी अजूनही खूप मेहनत घेत आहे. पण या स्पर्धेत माझा कोर्टवरचा दृष्टिकोन, माझी लढण्याची भावना आणि माझे समर्पण सकारात्मक राहिले. हे सर्व आजही माझ्यात आहे, तो म्हणाला.

आता जोकोविचची नजर यूएस ओपन 2026 वर असेल. त्याने 2023 मध्ये यूएस ओपनमध्ये त्याचे पूर्वीचे आणि आतापर्यंतचे 24 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकले.

भविष्यातील योजनांबद्दल तो म्हणाला, माझ्यावर खेळण्याचा कोणताही दबाव नाही किंवा कोणीही माझ्यावर खेळण्यासाठी जबरदस्ती करत नाही. मी खेळतो कारण मला खेळायचे आहे आणि माझा विश्वास आहे की मी अजूनही टॉप-10 किंवा टॉप-5 स्तरावरील टेनिसपटू आहे. भविष्यात काय घडते ते आपण पाहू.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande