
बीड, 14 जुलै, (हिं.स.)। बीडच्या गेवराई तालुक्यातील मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारे स्वर्गीय रामेश्वर मते यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर करण्यात आलेल्या १० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश तहसील कार्यालय, गेवराई येथे प्रदान करण्यात आला. नायब तहसीलदार सुभाष कट्टे यांच्या हस्ते हा धनादेश त्यांच्या पत्नी सुरेखा रामेश्वर मते यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते. या मदतीमुळे कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला असून, रामेश्वर मते यांचे मराठा आरक्षणासाठीचे बलिदान कायम स्मरणात राहील अशा भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आल्या
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis