
मंडळाच्या जून जुलै परीक्षांचे निकाल घोषित
नाशिक, 14 जुलै (हिं.स.)। - माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या जून - जुलै मधील दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल घोषित करण्यात आला असून दहावीचा निकाल 41.45 टक्के तर बारावीचा निकाल 42.1 टक्के लागल्याचे विभागीय मंडळाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
दहावी आणि बारावीच्या मार्च मधील परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जून जुलै मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे निकाल माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने मंगळवारी घोषित करण्यात आले .
इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये नाशिक परीक्षा मंडळाकडून 6277 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 2602 मुलं हे उत्तीर्ण झाले असून नाशिक विभागाचा निकाल 41.45 टक्के लागलेला आहे.
इयत्ता दहावीच्या परीक्षांमध्ये सर्वात जास्त निकाल धुळे जिल्ह्याचा लागला असून धुळे जिल्ह्यामध्ये 641 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 499 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत धुळे जिल्ह्याचा निकाल 77.4 टक्के लागला आहे त्या खालोखाल जळगाव जिल्ह्याचा निकाल लागला असून जळगाव जिल्ह्यामध्ये 2997 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी बाराशे 67 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल 42.27/ टक्के लागला आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये 250 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते त्यापैकी 83 विद्यार्थी हे परीक्षा उत्तीर्ण झाले असून या जिल्ह्याचा निकाल 33.20% लागलेला आहे नाशिक जिल्ह्याचा निकाल 31.51% लागला असून 2389 मुलं ही परीक्षेला बसलेली होती त्यापैकी 753 विद्यार्थी उत्तीर्ण झालेली आहेत.
इयत्ता बारावीच्या परीक्षांचा निकाल देखील घोषित करण्यात आला असून नाशिक मंडळामध्ये एकूण 749 विद्यार्थी हे परीक्षेला बसले होते त्यापैकी 3256 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून नाशिक विभागाचा निकाल 42.1 टक्के लागला आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातून तीन हजार 287 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 1310 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून नाशिक जिल्ह्याचा निकाल 39.85% लागला आहे धुळे जिल्ह्यामध्ये 1283 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते त्यापैकी 870 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाल्या असून धुळे जिल्ह्याचा निकाल 67.80% लागलेला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये 2834 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते त्यापैकी 946 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल 33.38 टक्के लागलेला आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये 345 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 130 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल 37.38% लागलेला आहे अशी माहिती नाशिक विभागीय मंडळाच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकामध्ये देण्यात आली आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV