
बीड, 14 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, बीड आगार येथे महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात अनेकांची उपस्थिती होती.
पर्यावरण संवर्धन, हरित बीड आणि स्वच्छ भविष्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. एक वृक्ष – एक जीवन हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचावा आणि प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन यावेळी केले.
या कार्यक्रमास विभाग नियंत्रक सौ. अनुजा दुसाने मॅडम, सुरक्षा व दक्षता अधिकारी श्री. रणजितजी यादव, लेखाकार श्रीमती कदम मॅडम, आगार व्यवस्थापक श्री. निलेशजी पवार, आगार निरीक्षक श्री. राजाभाऊ आतकरे तसेच आगारातील चालक, वाहक, यांत्रिक व इतर कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, बीड आगाराने आयोजित केलेला हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने अत्यंत स्तुत्य असून, अशा उपक्रमांमधून समाजात हरित महाराष्ट्राचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis