
लातूर, 23 जुलै (हिं.स.)।
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १७० व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १७० व्या जयंतीनिमित्त लोकमान्य टिळक विचारमंच, लातूर यांच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास लातूर महानगरपालिकेच्या महापौर जयश्रीताई सोनकांबळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित आहेत. तसेच महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली आहे.
कार्यक्रमात लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रसेवा, स्वराज्याच्या विचारांचा वारसा आणि समाजप्रबोधनातील योगदानाला उजाळा देण्यात येत असून विविध मान्यवरांकडून मनोगते व्यक्त केली जात आहेत.
कार्यक्रमस्थळी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती असून जयंती उत्साहात साजरी केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis