
अमरावती, 23 जुलै (हिं.स.)
सुप्रसिध्द गायिका वैशाली माडे ठरणार कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत सर्व विद्यार्थी विकास अधिकारी आणि समान संधी कक्ष समन्वयक यांच्या कार्यशाळेचे दिनांक 31 जुलै रोजी सकाळी 10 वाजता विद्यापीठातील डॉ. के.जी. देशमुख सभागृह येथे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन समारंभामध्ये सत्र 2025-26 मध्ये मध्य विभाग, अखिल भारतीय व राष्ट्रीय कव्वाली आंतर विद्यापीठ अशा विविध स्पर्धांमध्ये अभूतपूर्व यश संपादन करुन प्राविण्य प्राप्त करणा-या विद्यार्थीकलावंत व व्यवस्थापकांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते गौरविले जाणार आहे. विविध स्पर्धांमध्ये गुणवंत विद्यार्थी कलावंतांच्या उत्तम कामगिरीमुळे विद्यापीठाला पहिल्यांदाच चॅम्पियन ट्रॉफी प्राप्त झाली आहे. या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद कामगिरीबद्दल गुणवंत विद्यार्थी कलावंत, आणि चमू व्यवस्थापकांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्रमुख अतिथी म्हणून प्रसिध्द पार्·ागायिका (फिल्मफेअर पुरस्कार विजेत्या) वैशाली माडे (मुंबई) ह्रा उपस्थित राहणार आहे.
सुप्रसिध्द गायिका वैशाली माडे ठरणार कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण
आपल्या जादुई आवाजाने अमरावतीचा झेंडा अटकेपार नेणारी सुप्रसिध्द गायिका वैशाली माडे यांनी महाविद्यालयीन शिक्षण अमरावती विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातूनच पूर्ण केले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आंतर विद्यापीठ व राष्ट्रीय स्पर्धेतील कलाक्षेत्रात चॅम्पियन बनण्याचा मान मिळवला आहे. या सर्व कलावंत चमंूचा सत्कार करण्याच्या निमित्ताने वैशाली माडे 31 जुलै ला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. या गौरव सोहळ्याला सर्व विभागप्रमुख, शिक्षक, विद्यापीठ परिक्षेत्रातील प्राविण्यप्राप्त विद्यार्थी कलावंत, चमू व्यवस्थापक आणि विद्याथ्र्यांनी मोठ¬ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी