
बीड, 23 जुलै (हिं.स.)।
आज जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलम ४५ अन्वये, उपसा सिंचन योजना क्रमांक ३ अंतर्गत खुंटेफळ व कुंबेफळ या गावठाणांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहत समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीस उपस्थित आमदार सुरेश धस यांनी उपस्थित राहून संबंधित विषयांचा सविस्तर आढावा घेतला.संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधत पुनर्वसनाची प्रक्रिया अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिककेंद्री करण्याबाबत सखोल चर्चा केली. तसेच प्रकल्पग्रस्त नागरिकांना न्याय्य भरपाई मिळावी, त्यांच्या हितांचे संपूर्ण संरक्षण व्हावे आणि विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी आवश्यक त्या सूचना यावेळी केल्या.
या बैठकीस जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन साहेब, अधीक्षक अभियंता श्रीमती पल्लवी जगताप, कार्यकारी अभियंता श्री. कृष्णा घुगे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) श्री. शैलेश सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी श्री. प्रबोदय मुळे तसेच भूसंपादन-पुनर्वसन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis