आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या पहिल्या तिमाही नफ्यात विक्रमी वाढ
मुंबई, 26 जुलै (हिं.स.)। आयडीएफसी फर्स्ट बँकेने आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीचे अनऑडिटेड आर्थिक निकाल जाहीर करत विक्रमी कामगिरीची नोंद केली आहे. ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीत बँकेचा करानंतरचा निव्वळ नफा (पीएटी) रु. १,०७५ कोटींवर पोह
IDFC FIRST Bank Posts Record JumpFirst-Quarter Profit


मुंबई, 26 जुलै (हिं.स.)। आयडीएफसी फर्स्ट बँकेने आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीचे अनऑडिटेड आर्थिक निकाल जाहीर करत विक्रमी कामगिरीची नोंद केली आहे. ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीत बँकेचा करानंतरचा निव्वळ नफा (पीएटी) रु. १,०७५ कोटींवर पोहोचला असून, गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील रु. ४६३ कोटींच्या तुलनेत तब्बल १३२.४ टक्क्यांची वाढ झाली आहे. बँकेच्या कर्जवाढीबरोबरच ठेवींमध्येही मजबूत वाढ झाल्याने व्यवसायाचा वेग कायम असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

बँकेचा एकूण ग्राहक व्यवसाय, म्हणजे कर्जे आणि ग्राहक ठेवी मिळून, ३० जून २०२५ रोजीच्या रु. ५,१०,०३१ कोटींवरून ३० जून २०२६ रोजी रु. ६,०४,७७६ कोटींवर पोहोचला असून त्यात वार्षिक १८.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. कर्ज आणि आगाऊ रक्कम रु. २,५३,२३३ कोटींवरून रु. ३,०५,३७० कोटींवर पोहोचत २०.६ टक्क्यांनी वाढली. गृहकर्ज, वाहन कर्ज, कॉर्पोरेट कर्ज आणि ग्राहक कर्ज या विभागांतील चांगल्या कामगिरीचा यामध्ये मोठा वाटा आहे. किरकोळ, कृषी आणि एमएसएमई कर्जपुस्तकही १८.२ टक्क्यांनी वाढून रु. २,४१,११८ कोटींवर पोहोचले, तर होलसेल कर्जपुस्तकात ३०.४ टक्क्यांची वाढ होऊन ते रु. ६४,२५२ कोटी झाले.

मालमत्तेच्या गुणवत्तेतही लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. बँकेचे ग्रॉस एनपीए १.९७ टक्क्यांवरून १.५१ टक्क्यांपर्यंत, तर नेट एनपीए ०.५५ टक्क्यांवरून ०.४४ टक्क्यांपर्यंत कमी झाले. आरएएम पोर्टफोलिओमधील ग्रॉस आणि नेट एनपीएतही अनुक्रमे १.४० टक्के आणि ०.५२ टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली आहे. ग्राहक ठेवी १६.६ टक्क्यांनी वाढून रु. २,९९,४०५ कोटींवर पोहोचल्या, तर सीएएसए ठेवींमध्ये २४.६ टक्क्यांची वाढ होऊन त्या रु. १,५८,४९२ कोटी झाल्या. परिणामी बँकेचे सीएएसए गुणोत्तर ५०.८ टक्क्यांवर पोहोचले. निधीचा खर्च ५.९६ टक्क्यांपर्यंत कमी झाला असून निव्वळ व्याज मार्जिन ५.९६ टक्क्यांवर पोहोचले आहे. खर्च-उत्पन्न गुणोत्तरातही सुधारणा झाली असून तरतुदींचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे.

या तिमाहीत बँकेला सीजीएफएमयू योजनेअंतर्गत रु. ५१४.८ कोटींचा दावा प्राप्त झाला. तसेच संभाव्य भू-राजकीय अनिश्चितता, मान्सून आणि इंधनाच्या किमतीतील चढ-उतार लक्षात घेऊन बँकेने सावधगिरीचा उपाय म्हणून रु. ५१५ कोटींची आकस्मिक तरतूद केली आहे. तिमाहीअखेर बँकेचा आरओए १.०६ टक्क्यांवर पोहोचला असून भांडवली पर्याप्तता गुणोत्तर १५.०५ टक्के, तर सीईटी-१ गुणोत्तर १३.३३ टक्के राहिले.

निकालांवर प्रतिक्रिया देताना व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. वैद्यनाथन यांनी सांगितले की, उच्च दर्जाची, नैतिक आणि तंत्रज्ञानाधारित बँक उभारण्याच्या दिशेने बँक सातत्याने वाटचाल करत आहे. मालमत्तेच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा होत असून ऑपरेटिंग लिव्हरेजचा सकारात्मक परिणाम आता स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे नफ्यात विक्रमी वाढ झाली असून बँकेच्या पुढील वाढीबाबतही विश्वास व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande