ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक पटकावल्याबद्दल राजा मुथुपंडीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
नवी दिल्ली, 27 जुलै (हिं.स.)भारोत्तोलनात भारताला आणखी एक पदक मिळाल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास उल्लेख केला आहे. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकल्याबद्दल त्यांनी राजा मुथुपंडीचे अभिनंदन केले.त
पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली, 27 जुलै (हिं.स.)भारोत्तोलनात भारताला आणखी एक पदक मिळाल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास उल्लेख केला आहे. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकल्याबद्दल त्यांनी राजा मुथुपंडीचे अभिनंदन केले.त्याच्या या यशाचा प्रत्येक भारतीयाला आनंद आणि अभिमान वाटतो असे मोदींनी म्हटले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

'एक्स'समाजमाध्यमावर सामायिक केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले की, भारताला भारोत्तोलनात आणखी एक पदक!ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवल्याबद्दल राजा मुथुपंडीचे अभिनंदन. त्याच्या या यशाचा प्रत्येक भारतीयाला आनंद आणि अभिमान वाटत आहे. त्याच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande