आ. रमेश कराड यांच्याकडून राज्यस्तरीय वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार प्राप्त विठ्ठल कटके यांचे अभिनंदन
लातूर, 28 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय ''वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार'' रेणापूर येथील ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल कटके यांना मिळाल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करून भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड या
आमदार रमेश कराड  यांनी केले अभिनंदन


लातूर, 28 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय 'वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार' रेणापूर येथील ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल कटके यांना मिळाल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करून भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी अभिनंदन केले.

मुंबई येथे कृषी दिनी आयोजित एका कार्यक्रमात राज्याचे महामहीम मा. राज्यपाल जिष्णूदेव वर्मा आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे व इतर अनेक मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.सदरील पुरस्कार मिळाल्याबद्दल लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील रेणापूर येथील ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल कटके यांचा यथोचित सत्कार करून भाजपाचे नेते लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेश आप्पा कराड यांनी अभिनंदन केले. यावेळी रेणापूर तालुक्यातील विविध वृत्तपत्राचे पत्रकार रफीक शिकलकर, सिद्धार्थ चव्हाण, चंद्रकांत कातळे, सुधाकर दहिफळे, बालाजी कटके, आर डी. अपसिंगेकर, निजाम शेख, नामदेव शिंदे, ईश्वर बद्दर, भरत भोसले, कोंडीराम काळे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande