डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा अनादर सहन करणार नाही; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध
मनमाड, 28 जुलै (हिं.स.) मनमाड नगर परिषदेच्या वतीने मटण मार्केटच्या वरच्या मजल्यावरील मल्टिपर्पज हॉलला भारताचे माजी राष्ट्रपती, ''मिसाईल मॅन'' डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. मात्र, नगर परिषदेच
Dr. A. P. J. Abdul Kalam will


मनमाड, 28 जुलै (हिं.स.) मनमाड नगर परिषदेच्या वतीने मटण मार्केटच्या वरच्या मजल्यावरील मल्टिपर्पज हॉलला भारताचे माजी राष्ट्रपती, 'मिसाईल मॅन' डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. मात्र, नगर परिषदेच्या या निर्णयावर वंचित बहुजन आघाडी, मनमाड शहराच्या वतीने तीव्र आक्षेप नोंदवत जोरदार विरोध दर्शवण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना सादर करण्यात आले आहे.

मनमाड नगर परिषदेच्या २१ जुलै २०२६ रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत २३ ठराव मंजूर करण्यात आले होते. यातील ठराव क्र. २ अन्वये मटण मार्केटच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील हॉलला भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्याचे निश्चित करण्यात आले.या निर्णयाबाबत बोलताना वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, डॉ. कलाम हे केवळ भारताचे माजी राष्ट्रपती नसून जागतिक कीर्तीचे थोर शास्त्रज्ञ आणि देशातील करोडो तरुणांचे प्रेरणास्थान आहेत. अशा महान व्यक्तिमत्त्वाचे नाव मटण मार्केटसारख्या ठिकाणी देणे नैतिक, व्यावहारिक आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत चुकीचे व दुर्दैवी आहे. हा एक प्रकारे डॉ. कलाम यांच्या महान विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अवमान आहे.नगर परिषद प्रशासनाने या निर्णयाचा तत्काळ फेरविचार करावा.मटण मार्केटऐवजी शहरातील एखाद्या भव्य वाचनालयाला, अभ्यासिकेला, संशोधन केंद्राला, क्रीडा संकुलाला किंवा मुख्य प्रशासकीय इमारतीला डॉ. अब्दुल कलाम यांचे नाव देऊन त्यांचा योग्य सन्मान करावा.प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य ओळखून त्वरित योग्य निर्णय न घेतल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा शहराध्यक्ष विलास आहिरे यांनी दिला हे निवेदन सादर करताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे, जिल्हा नेते दीपक बाबा साळवे,अमोल केदारे (शहर सरचिटणीस), सागर गाढे ( उपाध्यक्ष) यांच्यासह खुशाल थोरात, सौरभ डोळस , गौतम कर्डक ,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande